ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची बातमी समोर आली आहे. तरुणाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने नैराश्यातून त...
ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची बातमी समोर आली आहे. तरुणाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचं वृत्त आहे.
संबंधित घटना हैदराबादच्या सुरारम परिसरात घडली असून येथे एका 24 वर्षीय तरुणाने ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हारल्यानंतर आत्महत्या केली. सध्या, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत तरुण सध्या बेरोजगार असून तो पूर्वी एका शैक्षणिक संस्थेत लॅब टेक्निशिअन म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित तरुणाचा त्याच्या एका नातेवाईकाच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यानंतर, मृताच्या कुटुंबियांकडून त्वरीत पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
मोबाईलमध्ये व्हिडीओ सापडला अन्...
प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, कुटुंबियांचे जबाब देखील नोंदवण्यात आले. पोलिसांनी मृताचा मोबाईल फोन तपासला असता त्यामध्ये एक रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सापडला. त्या व्हिडीओमध्ये तरुणाने ऑनलाइन गेमिंगच्या नादात पैसे गमावल्याचं सांगितलं आहे. अद्याप, तरुणाचं नेमकं किती आर्थिक नुकसान झालं? हे स्पष्ट झालं नाही. प्राथमिक तपासानुसार, पीडित तरुण मानसिक तणावात असून याच नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.


COMMENTS