भर रस्त्यात 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या! घटनेनंतर, संतप्त टोळक्याची परिसरात दहशत... | CrimeNama
Loading ...

भर रस्त्यात 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या! घटनेनंतर, संतप्त टोळक्याची परिसरात दहशत...

  अमरावती: अमरावतीत जुन्या वैमनस्यातून एका 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी (19 डिसेंबर) दुपारी जवळपास 3.30 वा...

 


अमरावती: अमरावतीत जुन्या वैमनस्यातून एका 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी (19 डिसेंबर) दुपारी जवळपास 3.30 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

संबंधित घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील वाळकी डॅमजवळ एका रस्त्यावर घडली. मंथन रविंद्र पालणकर (19) अशी मृताची ओळख समोर आली आहे.


चाकूने वार करत हत्या


पोलिसांच्या माहितीनुसार, बाईकवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी रस्त्यावर मंथनला घेरलं आणि त्याच्या पोट, पाठीवर चाकूने वार केले. त्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मंथनचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात


तरुणाच्या हत्येची बातमी पसरताच, 10 ते 15 जणांच्या टोळक्याने गोपालनगर, केडियानगर आणि शंकरनगर परिसरात दहशत माजवली. संतापलेल्या तरुणांनी 7 ते 8 गाड्यांची तसेच, कित्येक दुचाकी वाहनांची तोडफोड केल्याचं सांगितलं जात आहे. याप्रसंगी राजापेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत 10 लोकांना ताब्यात घेतलं. तसेच, संतोष घाते, सुजल शर्मा आणि सुजल जायभाये नांदगाव पेठ पोलिसांच्या अटकेत आहेत.

नेमकं काय घडलं?


पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मंथन पालणकर हा 21 ऑगस्ट 2024 रोजी घडलेल्या यश रोडगे हत्याप्रकरणातील आरोपी असून याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी त्याची हत्या केल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंथन डॅमकडे जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर, वाळकी डॅमच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच आरोपींनी पीडित तरुणासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. दरम्यान, त्यांनी मंथनच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने बरेच वार केले आणि यामध्ये पीडित तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3787,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1248,Dhule,12,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,450,India,565,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,299,Maharashtra,1711,Mumbai,416,Nagpur,49,Nashik,58,Politics,607,Pune,1875,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,65,Technology,33,World,68,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: भर रस्त्यात 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या! घटनेनंतर, संतप्त टोळक्याची परिसरात दहशत...
भर रस्त्यात 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या! घटनेनंतर, संतप्त टोळक्याची परिसरात दहशत...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzTu-KPPwcK0F2p4uCrS21ror_xg0ifdOYNgfIbt8tP6EzR1DFkCkVKhIbhvuLsdSGJmN5cAwRffWCSM7ovccTCynvPp-8hS5CF018InF8UNC1OxpvbwFoc5oSsGhF3ij1960I7SbQS61Koa8zYmzZvSDVjd6J-p0XBNzeYkd9ts8MarKfPcPUNTa1oyg/s320/1001657022.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzTu-KPPwcK0F2p4uCrS21ror_xg0ifdOYNgfIbt8tP6EzR1DFkCkVKhIbhvuLsdSGJmN5cAwRffWCSM7ovccTCynvPp-8hS5CF018InF8UNC1OxpvbwFoc5oSsGhF3ij1960I7SbQS61Koa8zYmzZvSDVjd6J-p0XBNzeYkd9ts8MarKfPcPUNTa1oyg/s72-c/1001657022.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/12/19_19.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/12/19_19.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content