नागपूर : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात ऑनलाईन फस...
नागपूर : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात ३५ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी २३ जणांना ताब्यात घेतले असून, दोघे आरोपी मध्यप्रदेशचे आहेत.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
भारतातील २१ राज्यात ही टोळी सक्रिय असल्याचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. २० कोटी पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार यात झाले आहे. यात ५४ लाख रूपये विविध बँक खात्यात गोठविण्यात पोलिसांना यश आले. ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी ही टोळी व्हाट्सअप आणि टेलिग्रामचा वापर करत होती. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एपीके फाईलचा वापर करत होते. कोणीही एपीके फाईल उघडली की त्याच्या मोबाईल मधल्या बँक अकाउंटची माहिती आणि ओटीपी फसवणूक करणाऱ्याकडे जात असे, अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली होती. यातील मुख्य गुन्हेगाराकडे सगळे कंट्रोल राहत होते. १३ मोबाईल फोनवरून ते सगळे व्यवहार करत होते. याचा मास्टरमाईंड देशाच्या बाहेर असण्याची शक्यता आहे.
नागपूर शहर पोलिसात एक प्रकरण दाखल झाले होते. यात फिर्यादीने तक्रारीत म्हटले होते की, बँक खात्यावर पैसे येत होते आणि जात होते. मात्र त्याच्याशी काहीही संबंध नसल्याने हे काय सुरू आहे हे कळत नसल्याने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता यामध्ये त्याच्या बँक खात्यात होत असलेल्या व्यवहारांमध्ये अनेक जणांचा समावेश असल्याचा संशय आला. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आणि एकाच जागेवर बसून एक व्यक्ती ऑपरेट करत असल्याचे लक्षात आल्यावर या प्रकारणाचा छडा लावण्यात आला. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS