पुणे : पुणे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाचा मृतदेह शुक्रवारी (ता. २८) सकाळी आढळून आला आहे. सागर पवार (वय 26) असे मृत यु...
पुणे : पुणे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाचा मृतदेह शुक्रवारी (ता. २८) सकाळी आढळून आला आहे. सागर पवार (वय 26) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सागर पवार हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून तो पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेईंग गेस्ट पद्धतीने राहत होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तो त्याच्या राहत्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी घाव घेतली आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला.
प्राथमिक तपासात सागरने MPSC चा अभ्यास करत असताना वाढलेल्या दडपणामुळे आणि नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही, त्यामुळे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर कारण समजू शकेल. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS