राष्ट्रपतीसोबत सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या एका धक्कादायक गैरवर्तनाच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यावर नागरिकांशी संवाद स...
राष्ट्रपतीसोबत सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या एका धक्कादायक गैरवर्तनाच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यावर नागरिकांशी संवाद साधत असताना एका व्यक्तीने मागून पकडून किस करण्याचा प्रयत्न केला.
हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गर्दीत संधी साधून गैरवर्तन
गेल्या वर्षी राष्ट्रपतीपद स्वीकारलेल्या मेक्सिकन राष्ट्रपती क्लॉडिया शेनबॉम यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी मेक्सिको सिटीमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेल्या असता त्यांच्यासोबत एका नागरिकाने अश्लील कृत्य केले. रस्त्यावर नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती, याच गर्दीचा फायदा घेऊन एका व्यक्तीने त्यांच्यासोबत गैर वर्तन केले.
थरारक घटना आणि सुरक्षा कर्मचाऱ्याचा हस्तक्षेप
व्हिडिओनुसार, त्या व्यक्तीने सुरुवातीला मागून क्लॉडिया यांना मागे खेचले आणि अश्लील स्पर्श करत किस करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सुरक्षा रक्षकाने पहिले असता तातडीने धावून आला आणि त्याने त्या व्यक्तीला राष्ट्रपतींपासून दूर केले. या गंभीर परिस्थितीतही महिला राष्ट्रपतींनी संयम राखला आणि त्यांनी हळूवारपणे त्या व्यक्तीचे हात बाजूला सारले.
या घटनेनंतर राष्ट्रपती क्लॉडिया शेनबॉम यांनी आपला संताप व्यक्त करताना खंत व्यक्त केली. “मला नेमकं काय घडलं हे व्हिडिओ पाहिल्यावरच समजलं,” असे त्या म्हणाल्या. त्या व्यक्तीने दारू किंवा ड्रग्जचे सेवन केले होते की नाही, हे माहीत नाही, पण “त्याने थेट राष्ट्राध्यक्षांसोबत असे गैरवर्तन केले, तर आपल्या देशातील इतर महिलांचे काय होणार?” असा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीला लगेचच अटक करण्यात आली असून त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMENTS