सोलापूर: बार्शी शहरात शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेदहाच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मातेने आपल्य...
सोलापूर: बार्शी शहरात शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेदहाच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मातेने आपल्या १४ महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वतः साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ७) बार्शी शहरात घडली आहे. अंकिता वैभव उकिरडे असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बार्शी शहरतील वाणी प्लॉट परिसरात ही घटना घडली आहे. घटनेच्या वेळी अंकिता मुलासह घरात एकटीच होती. घरकामासाठी आलेल्या महिलेने घरात कोणी दिसत नसल्याने खिडकीतून पाहिले, तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला. आईने विष पाजलेल्या या १४ महिन्यांच्या मुलाला तातडीने उपचारांसाठी बार्शी येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, जिथं त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
अंकिता हिचं लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी झालं होतं. घटनेच्या वेळी घरातील सर्व लोक कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता घरात चिमुकल्यासह एकटीच होती, अशी माहिती समोर आली आहे. या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास बार्शी शहर पोलिस कसून करत आहेत.


COMMENTS