पत्नीला कंटाळला, मित्र म्हणाला, "दुसरं लग्न करून टाक" पण दुसऱ्या बायकोच्या नादात भलतंच... | CrimeNama
Loading ...

पत्नीला कंटाळला, मित्र म्हणाला, "दुसरं लग्न करून टाक" पण दुसऱ्या बायकोच्या नादात भलतंच...

  दिल्लीतील रोहिणी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे दुसरं लग्न करण्यावरून दोन्ही मित्रांमध्ये मोठा वाद झाला आणि हे भांडण इतकं...

 


दिल्लीतील रोहिणी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे दुसरं लग्न करण्यावरून दोन्ही मित्रांमध्ये मोठा वाद झाला आणि हे भांडण इतकं टोकाला पोहोचलं की दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित घटना ही 7 ऑक्टोबर रोजी रात्री रिठाला बस स्टँडजवळ बसली. प्रकरणातील पीडित तरुणाचं नाव जगदीश असून त्याचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र, त्याच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच अडचणी होत्या. पती आणि पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. याच कारणामुळे, जगदीशने आपल्या पत्नीला तिच्या माहेरी सोडून येण्याचा निर्णय घेतला. तो 6 ऑक्टोबर रोजी आपल्या पत्नीला तिच्या माहेरच्या घरी सोडून पुन्हा 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीला परत आला.


मुलगी शोधण्यासाठी 60 हजार रुपये दिले...


घरी परतल्यानंतर, पीडित तरुणाने त्याच्या मित्राला आपल्या वैवाहिक आयुष्यातील अडचणींबद्दल सांगितलं. आनंदी जीवनासाठी त्याची दुसरं लग्न करण्याची इच्छा असल्याचं त्याने त्याच्या मित्राला सांगितलं. त्यावेळी तरुणाचा मित्र दीपकने त्याच्यासाठी चांगली मुलगी बघणार असल्याचं सांगितलं. मात्र, त्याच्या या कामासाठी दीपकने आपल्या मित्राकडून पैसे मागितले. पीडित जगदीशने लग्नासाठी चांगल्या मुलगी मिळणार या आनंदात आपल्या मित्राला 30 हजार रुपये दिले आणि 7 ऑक्टोबरच्या संध्याकाळी आणकी 30 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. एकूण 60 हजार रुपये दिल्यानंतर, जगदीश लग्नासाठी चांगली मुलगी मिळणार या आशेत होता.

चाकूने मित्रावर हल्ला


मात्र, त्या दिवशी संध्याकाळी जवळपास 11 वाजताच्या सुमारास दीपकने जगदीशला रिठाला बस स्टँडजवळ बोलवलं. जगदीश तिथे पोहोचला आणि त्याने आपल्या मित्राला मुलीबद्दल विचारलं. त्यानंतर, आरोपी दीपक यावर प्रचंड संतापला. दरम्यान, दीपकने रागाच्या भरात चाकू बाहेर काढला आणि आपल्या मित्राच्या छातीवर वार केला. हल्ल्यानंतर, जगदीशने आपला छातीत रुतलेला चाकू बाहेर काढला आणि त्याच चाकूने दीपकवर हल्ला केला. दरम्यान, दीपक जखमी झाला आणि घटनास्थळावरून तो फरार झाला.

आरोपींवर गुन्हा दाखल


या घटनेबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि गंभीररित्या जखमी झालेल्या जगदीशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपी दीपकवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 109 (1) अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, जगदीशवर सुद्धा धोकादायक शस्त्राने जखम पोहोचवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपकला 10 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. सध्या, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,82,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3791,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1252,Dhule,12,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,450,India,568,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,299,Maharashtra,1711,Mumbai,416,Nagpur,49,Nashik,58,Politics,607,Pune,1875,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,65,Technology,33,World,68,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: पत्नीला कंटाळला, मित्र म्हणाला, "दुसरं लग्न करून टाक" पण दुसऱ्या बायकोच्या नादात भलतंच...
पत्नीला कंटाळला, मित्र म्हणाला, "दुसरं लग्न करून टाक" पण दुसऱ्या बायकोच्या नादात भलतंच...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuhVOPMqH-HzR0t3gb7b3oLB3b7T8KoIV-PF6SlJzGmBWKwgoVAsTRNi7KySkOuDzXWqa1CwMOn8noNAKTLO32Xe6BJbyeBHB0tJx4ewey1pb_NJKP6ZBxN-NXehg03ylhF6mcyFnF4WZIRt9SWNmprC2qXDua7J7ImOiDK9ULV9o5v7tsmb2pxovaZqo/s320/1001496659.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuhVOPMqH-HzR0t3gb7b3oLB3b7T8KoIV-PF6SlJzGmBWKwgoVAsTRNi7KySkOuDzXWqa1CwMOn8noNAKTLO32Xe6BJbyeBHB0tJx4ewey1pb_NJKP6ZBxN-NXehg03ylhF6mcyFnF4WZIRt9SWNmprC2qXDua7J7ImOiDK9ULV9o5v7tsmb2pxovaZqo/s72-c/1001496659.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/11/blog-post_84.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/11/blog-post_84.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content