राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील विविध पदांसाठी उमेदवारांची भरती केली जात आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध कारण्यासदेखील सुरुवात...
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील विविध पदांसाठी उमेदवारांची भरती केली जात आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध कारण्यासदेखील सुरुवात झाली आहे. सार्वजनिक समुदाय आरोग्य विभागाच्या वतीने अधिकारी (कंत्राटी) १९७४ जागा व वैद्यकीय अधिकारी (गट - अ) १४४० अशा सुमारे ३५०० पदांसाठी भरती काढण्यात आली आहे.
याबाबतची जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसिद्ध केले आहे. परंतु यात एनटी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्यामुळे आता वादाला नवीन कारण मिळाले आहे. यावर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही जाहिरात रद्द करून नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. ०४ डिसेंबर, २०२५ रोजी समूदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) या पदाच्या सुमारे १९७४ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिराती मध्ये एन टी डी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र. ०१/२०२५, दि. ०४ नोव्हेंबर, २०२५ यान्वये एकूण १४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत असून या जाहिराती मध्ये एन टी प्रवर्गातील अ, ब, क, ड या चारही प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. राज्यभरात या प्रवर्गातील लाखो विद्यार्थी असून ते या पदांसाठी प्रयत्न करत आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या एन टी प्रवर्गातील अनेक उमेदवारांनी दूरध्वनी व्दारे तसेच विविध माध्यमातून माझ्याकडे तक्रार केली असून, या दोन्ही जाहिरातीच्या माध्यमातून एन टी प्रवर्गासाठी सुमारे ३५०० जागांमध्ये एकही जागा आरक्षित नसले बावत संताप व दुःख व्यक्त केले आहे.
पुढे त्यांनी या दोन्ही जाहिरातीच्या माध्यमातून एन टी प्रवर्गासाठी जागा आरक्षित नसणे हे गंभीर व अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच तातडीने या जाहिरातीस स्थगिती देऊन, आरक्षित पदांची फेरतपासणी करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करणे गरजेचे असल्याचे धनंजय मुंडे यांनी या पत्रात म्हटले. पुढे त्यांनी कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही यासाठी या दोन्हीही जाहिरातीस स्थगिती देऊन नव्याने जाहिराती प्रसिद्ध करण्याची विनंती केली आहे.
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील विविध पदांसाठी उमेदवारांची भरती केली जात आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध कारण्यासदेखील सुरुवात झाली आहे. सार्वजनिक समुदाय आरोग्य विभागाच्या वतीने अधिकारी (कंत्राटी) १९७४ जागा व वैद्यकीय अधिकारी (गट - अ) १४४० अशा सुमारे ३५०० पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. याबाबतची जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसिद्ध केले आहे. परंतु यात एनटी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्यामुळे आता वादाला नवीन कारण मिळाले आहे. यावर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही जाहिरात रद्द करून नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.


COMMENTS