दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा. | CrimeNama
Loading ...

दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा.

  पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहे...

 


पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वारजे माळवाडी पोलिस ठाणे येथे २८/१०/२०२५ रोजी समीर पंजाबराव जाधव याने त्याची पत्नी अंजली समीर जाधव (वय ३८) हि २६/१०/२०२५ रोजी दुपारी ०२ / १५ वा चे सुमारास वारजे ब्रिज जवळील, वारजे कडुन कात्रजकडे जाणाऱ्या रोडवरील बस स्टॉपजवळ, वारजे पुणे येथुन मिसींग झाल्याबाबत मिसींग तक्रार दिली होती. सदर मिसींगचा तपास हा पोलिस उपनिरीक्षक नितीन गायकवाड यांच्याकडे देण्यात आला होता. दाखल मिसींगच्या अनुशंगाने समीर जाधव याला चौकशीकामी बालोवले असता त्याने त्याची पत्नी ही श्रीराम मिसळ हाऊस, गोगलवाडी फाटा, मुंबई बेंगलोर हायवे, शिंदेवाडी पुणे येथुन मिसींग झाल्याबाबत सांगीतले होते. त्यामुळे सदरची मिसींग ही राजगड पोलिस ठाणे येथे वर्ग करण्यात आली होती.


समीर पंजाबराव जाधव हा सांगत असलेली हकीकत मध्ये संशयास्पद हालचाली वाटत असल्याने वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी तपास पथक प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे व पोलिस उपनिरीक्षक नितीन गायकवाड यांना सदर मिसींग जरी राजगड पोलिस ठाणे कडे वर्ग झाली असली तरी चौकशी पुढे चालू ठेवण्याचे सांगितले होते. तसेच दाखल मिसींगचा तपास योग्य प्रकारे करण्यासाठी पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी आदेशित केले होते.


पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे व पोलिस उपनिरीक्षक नितीन गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण चालू ठेवले होते. सदरची मिसींग दाखल झाल्यानंतर मिसींग महिलेचा तक्रारदार पती हा वारंवार पोलिस ठाणेस येवून माझ्या पत्नीला कधी शोधणार याबाबत आत्मीयतेने चौकशी करत होता. त्यामुळे तक्रारदार पती याच्या हालचाली, मिसींग महिला मिसींग झाल्याचे दिवशीचे सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषन याद्वारे तसेच तक्रारदार पती समीर पंजाबराव जाधव (वय ४२, व्यवसाय- गॅरेज रा. फ्लॅट नं – ३०४ श्री. स्वामी संकुल अपार्टमेंट, तलाठी ऑफीसशेजारी, शिवणे पुणे) याने सांगितलेल्या गोष्टी यामध्ये तफावत दिसुन येत होती. यावरुन मिसींग महिलेचे काहीतरी बरे वाईट केले असल्याचे लक्षात आल्याने मिसींगमधील तक्रारदार पती याने संपुर्ण गोष्टी नियोजनबध्द केलल्या असल्यातरी त्याच्याकडून गुन्हा करताना, राहून गेलेल्या एक दोन गोष्टीवर वारंवार विचारणा करुन सरतेशेवटी त्याला सदरचा गुन्ह कसा केला? असता त्याला बोलता केला.


त्याने सांगितले की, ‘पत्नीचे सतेज पाटील याच्यासोबत मागील काही वर्षभरापासुन प्रेमसंबध असल्याचा मला संशय आला होता. काही वेळा मी तिचे मोबाईलमधील त्याच्या बरोबरचे चॅटींग पकडले होते. त्यामुळे मागील दिड वर्षामध्ये आमचेमध्ये अनेकवेळा वादविवाद झाले होते. मी तिला सुधरविण्याचा प्रयत्न केला असता, ती प्रत्येक वेळी मी परत असे करणार नाही असे सांगायची. परंतु, तिने सतेज पाटील याच्याबरोबर असणारे प्रेमप्रकरण तसेच चालु ठेवले. त्यामुळे मागील एक महिन्यापुर्वीच मी तीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मी एक नियोजन तयार केले होते. त्यामध्ये मी गोगलवाडी फाटा शिंदेवाडी

येथून आतमध्ये दोन किलोमीटर अंतरावर एक गोडाऊन १८ हजार महिना याप्रमाणे भाडयाने घेतले होते. त्यानंतर मी एक लोखंडी बॉक्स तयार करुन सदरच्या गोडाऊनमध्ये ठेवून दिला होता. नंतर मी वनदेवी मंदीराजवळील गोसावीवस्ती, कर्वेनगर पुणे येथुन एका वखारीतुन दोन पोती लाकडे विकत घेऊन माझ्या

कारमधुन ती सदरच्या गोडाऊनमध्ये नेवुन ठेवली होती.


२६/१०/२०२५ रोजी मी माझी पत्नी अंजली हिस माझी हुन्डाई कंपीनीची आय टेन कार नं-एम.एच.१२ एफ.यु.०८६४ यामधुन फिरायला जायच्या बहाण्याने माझ्या राहते घरातुन नांदेडसिटी, नवले ब्रिजमार्गे बेंगलोर मुंबई हायवेने खेडशिवापुरजळील मरीआई घाटामध्ये फिरण्यासाठी घेऊन गेलो होता. त्यानंतर आम्ही परत माघारी येताना, सर्वीस रोडवरील ब्राऊनस्टोन या हॉटेलमध्ये वॉशरुमसाठी थांबलो होतो. त्यानंतर तेथुन परत शिंदेवाडी येथील गोगलवाडी फाटा येथील एका हॉटेलमधुन भेळ विकत घेऊन मी भाडयाने घेतलेल्या गोडाऊनमध्ये माझ्या पत्नीला घेऊन गेलो होतो. त्यानंतर सदर गोडाऊनचे आतमध्ये चटईवर बसुन भेळ खात असताना, मी अचानक तिचा दहा मिनीटे जिव जाईपर्यंत गळा दाबुन ठेवला. त्यानंतर ती मेल्याची खात्री पटल्यानंतर आधीपासूनच आणलेल्या लोखंडी बॉक्समध्ये तिचे प्रेत टाकुन त्यावर पेट्रोल ओतुन तिला जाळले व सदरची जाळलेली राख ही नदीपात्रात टाकुन दिली व सदरचा लोखंडी बॉक्स हा स्क्रॅप करुन टाकला आहे, असे आरोपीने सांगितले.


सदरबाबत पोलिस उप निरीक्षक नितीन गायकवाड वारजे माळवाडी पोलिस ठाणे यांचे फिर्यादीवरुन आरोपी समीर पंजाबराव जाधव (वय – ४२ वर्षे व्यवसाय- गॅरेज रा. फ्लॅट नं- ३०४ श्री. स्वामी संकुल अपार्टमेंट, तलाठी ऑफीसशेजारी, शिवणे पुणे) याचेविरुध्द वारजे माळवाडी पोलिस ठाणे गुन्हा रजि नं-००/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल करुन राजगड पोलिस ठाणे येथे वर्ग करण्यात आलेला आहे.


सदरची कारवाई ही संभाजी कदम, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर, भाऊसाहेब पटारे, सहा. पोलिस आयुक्त, कोथरुड विभाग यांचे सुचनेनुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), प्रकाश धेंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलिस उप निरीक्षक नितीन गायकवाड, पोलिस अंमलदार गणेश कर्चे,सुनिल मुठे, योगेश वाघ, शरद पोळ, शिरीष गावडे वारजे माळवाडी पोलिस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,35,Breakin,1,Breaking,3654,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1144,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,489,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,291,Maharashtra,1675,Mumbai,404,Nagpur,46,Nashik,56,Politics,598,Pune,1852,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,39,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा.
दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTS68ty148FWMnrCTZkkSYzEPtBlWQkm7yq7YgdeitUw_nfz5aVzj-1glTb3UWeV_691i9hSzxHA5JgP1Q9ZO3V-FKcMeK801AC4zyTGt5xxD5NO3Vk19q15sLyuKYUnR3xL2KKIffWGJ1dbVyj2orsLzDYSmsc_i2bDrAjteETLlohwPfThUTT4xLgRc/s320/1001491577.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTS68ty148FWMnrCTZkkSYzEPtBlWQkm7yq7YgdeitUw_nfz5aVzj-1glTb3UWeV_691i9hSzxHA5JgP1Q9ZO3V-FKcMeK801AC4zyTGt5xxD5NO3Vk19q15sLyuKYUnR3xL2KKIffWGJ1dbVyj2orsLzDYSmsc_i2bDrAjteETLlohwPfThUTT4xLgRc/s72-c/1001491577.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/11/blog-post_81.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/11/blog-post_81.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content