राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊन ३ टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच अनुषंगाने महायुती आणि ...
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊन ३ टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान महायुती एकत्रित लढणार की स्वबळावर याची चर्चा सुरू आहे. अधिवक्ता परिषद रायगड व पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अधिवक्ता कार्यशाळेला मंत्री आशिष शेलार आज उपस्थित होते. तसेच रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजनही करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावर मंत्री आशीष शेलार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली आहे.
Ashish Shelar : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊन ३ टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान महायुती एकत्रित लढणार की स्वबळावर याची चर्चा सुरू आहे. अधिवक्ता परिषद रायगड व पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अधिवक्ता कार्यशाळेला मंत्री आशिष शेलार आज उपस्थित होते. तसेच रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजनही करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावर मंत्री आशीष शेलार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली आहे.
उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी नव्हे, तर मत गोळा करण्यासाठी बांधावर गेले आहेत, असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर लगावला आहे. तसेच स्वतः काही काम न करता शासकीय यंत्रणा चालू असताना राजकीय दौरे करून मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही आशिष शेलार म्हणाले. तर सिंधुदुर्ग येथील महायुतीबाबत बोलताना, फक्त सिंधुदुर्ग नव्हे, तर राज्यभर महायुतीसोबत लढण्याचा निर्णय आहे. विरोधी पक्षाला फायदा होऊ नये, म्हणून काही ठिकाणी वेगळं लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
तर पुढे बोलताना, सध्या राज्यात सुरु असणाऱ्या पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर, चौकशीसाठी वरिष्ठ अधिकार्यांची समिती नेमली आहे. त्यामुळे सत्य नक्कीच समोर येईल, असे आशिष शेलार म्हणाले. तर रायगड युतीवर बोलताना, भाजप स्वतंत्र लढणार किंवा महायुतीपासून वेगळं जाणार, अशी कोणतीही चर्चा नाही. महायुतीत एकत्र लढण्याचा सर्वसाधारण निर्णय आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि तेलंगणा मुख्यमंत्रीवर प्रतिक्रिया देताना, काँग्रेस हा तुष्टीकरणाच्या बाजारातील सर्वात मोठा पक्ष आहे. मुस्लिम धार्जिण भूमिका घेणे, ही काँग्रेसची परंपरा आहे. तर मतांसाठी कोणत्याही टोकाला जाण्याचे उदाहरण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते, असा निशाणा त्यांनी यावेळी साधला.
आशिष शेलार काय म्हणाले?

COMMENTS