नांदेड : प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी युवकाचा खून केला होता. प्रियकरावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी युवतीने स्वतःला हळद लावून घेतली...
नांदेड : प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी युवकाचा खून केला होता. प्रियकरावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी युवतीने स्वतःला हळद लावून घेतली, कपाळावर कुंकू आणि सिंदूर भरले आणि प्रियकराच्या मृतदेहालाही हळद लावत कुंकू लावून घेतले.
आयुष्यभर तुझीच राहिल, असे म्हणत युवतीने टाहो फोडला. संबंधित दृष्याने अनेकांचे डोळे पानवले.
सक्षम ताटे या युवकाला मुलीचे वडील आणि भावाने पाठलाग करुन ठार मारले होते. सक्षमवर गोळ्या झाडल्या आणि त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला ठार मारले. सक्षम ताटे याचे त्याच्या मित्राची बहीण आंचल मामीलवाड हिच्याशी प्रेमसंबंध होते. याची कुणकुण लागल्यानंतर आंचलच्या वडिलांनी सक्षमला आपल्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतरही या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु राहिल्याने गुरुवारी संध्याकाळी नांदेड शहरातील जुना गंज भागात आंचलचे वडील आणि भावाने सक्षमची हत्या केली होती.
गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 20 वाजण्याच्या सुमारास सक्षम ताटे याला मुलीच्या वडिलांना बोलावून घेतले होते. याठिकाणी आल्यानंतर गजानन मामीलवाड, साहिल मामीलवाड आणि अन्य तिघांनी मारहाण करुन त्याची हत्या केली. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सक्षम ताटे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यावेळी त्याची प्रेयसी आंचल मामीलवाड हिने एक अनपेक्षित कृती केली. ती सक्षमच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिने सक्षमच्या मृतदेहासमोर लग्नाचे काही विधी केले. तसेच तिने सगळ्यांदेखत कपाळावर सक्षमच्या नावाचे कुंकू लावले. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्या मनात कालवाकालव झाली. सक्षमचा मृतदेह घरी आणताच तिने टाहो फोडला. अंत्यविधीपूर्वी तिने हळद आणि कुंकू लावून घेतले. शिवाय कपाळावर कुंकू भरले. यावेळी सक्षमला देखील हळद लावण्यात आली. हा प्रसंग पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.
दरम्यान, सक्षम आणि आंचल याचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सक्षम वेगळ्या जातीचा असल्याने हे प्रेमसंबंध आंचलच्या घरच्यांना मान्य नव्हते. सक्षम ताटे जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या कुटुंबातील लोक त्याच्या खूनाचा कट रचत होते, असे आंचलने सांगितले. आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी आणि भावाने सक्षमला मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला. आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही आंचलने केली आहे. पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामीलवाड यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामीलवाड, साहील ठाकूर, सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS