पुणे : पुणे शहरातील मुंढवा भागातील जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शीतल तेजवानी हिने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यार...
पुणे : पुणे शहरातील मुंढवा भागातील जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शीतल तेजवानी हिने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी जो पत्ता वापरला, त्या परामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळे आहे.
शीतलच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा या प्रकरणातील रोल समोर येऊ शकतो.
मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांचे मामेभाऊ आणि व्यवसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगणमत करुन शासनाचा 5 कोटी 89 लाख 31 हजार आठशे रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ एटर्नी असलेल्या शितल मेजवानी आणि नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी रविंद्र तारू यांचा समावेश आहे. मात्र दिग्विजय पाटलांचे व्यवसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जर एका व्यवसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा भागिदार असलेल्या पार्थवर गुन्हा का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तिघांवरील आरोप पुढीलप्रमाणे…
1. शीतल तेजवाणी- जागेची पॉवर ऑफ एटर्नी असल्याचे सांगत जमीन विकली.
2. दिग्विजय पाटील- पार्थ पवार यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांनी मुद्रांक शुल्काचे पाच कोटी 89 लाख रुपये बुडवले.
3. रविंद्र तारु- नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी असूनही खरेदी-विक्रीवरचा 2 टक्के अधिभार आणि कर वसूल केला नाही.


COMMENTS