हरियाणा निवडणुकीवरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ माज...
हरियाणा निवडणुकीवरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ माजवली आहे. निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट बोट ठेवत राहुल गांधींनी "मतदान चोरले गेले" असा गंभीर आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी 'ब्राझील मॉडेल'चा दाखला देत हरियाणात एका महिलेने तब्बल १० वेळा मतदान केले असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने हरियाणात ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये फेरफार आणि डुप्लिकेट नावांचा खेळ झाल्याचे पुरावे मिळवले आहेत, ते आज त्यांनी लोकांसमोर ठेवले.
हरियाणा निवडणुकीवरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ माजवली आहे. निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट बोट ठेवत राहुल गांधींनी "मतदान चोरले गेले" असा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी 'ब्राझील मॉडेल'चा दाखला देत हरियाणात एका महिलेने तब्बल १० वेळा मतदान केले असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने हरियाणात ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये फेरफार आणि डुप्लिकेट नावांचा खेळ झाल्याचे पुरावे मिळवले आहेत, ते आज त्यांनी लोकांसमोर ठेवले.
राहुल गांधी म्हणाले, "हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान आमच्या उमेदवारांनी अनेक विसंगती दाखवल्या होत्या. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत दाखवले जात होते, पण निकाल पूर्णपणे वेगळा लागला. पोस्टल मत आणि प्रत्यक्ष मतदान यामध्ये जबरदस्त तफावत होती. हे सर्व पाहून आम्ही तपशीलवार चौकशी सुरु केली आणि आम्हाला जे आढळले, त्यावर विश्वास बसणे कठीण आहे. आम्ही हे डेटा आणि पुराव्यांसह सिद्ध करू शकतो की, हरियाणात मतांची चोरी झाली आहे."
त्यांनी आपल्या सादरीकरणात स्क्रीनवर काही उदाहरणं दाखवली एकाच महिलेचा फोटो मतदार यादीत २२३ वेळा दिसतोय, काही ठिकाणी फोटोज अस्पष्ट आहेत, काही ठिकाणी नाव आणि वय जुळत नाही. राहुल गांधी म्हणाले, "ही महिला इतक्या वेळा वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर का दिसते? हा निवडणूक आयोगाचा अपयश नाही, तर नियोजित कट आहे. म्हणूनच सीसीटीव्ही फुटेजही काढून टाकलं जातं जेणेकरून कोणी पुरावा दाखवूच शकणार नाही."
राहुल गांधींनी स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटलं, "निवडणूक आयोगाकडे डुप्लिकेट मतदार काढण्यासाठी सॉफ्टवेअर आहे, पण ते ते वापरत नाहीत. कारण त्यांना स्वच्छ निवडणूक नको आहे. त्यांना भाजपला मदत करायची आहे. हे एआयने करायचं कामही नाही फक्त काही सेकंदात हे शक्य आहे. पण जेव्हा हेतूच मतांची चोरी करण्याचा असेल, तेव्हा पारदर्शकतेचा प्रश्नच नाही."
यावेळी राहुल गांधींनी एक ब्राझिलियन मुलीचा फोटोही दाखवला आणि तो हरियाणाच्या मतदार यादीत कसा आला, असा खळबळजनक प्रश्न विचारला. "ही महिला कोण आहे? तिची हरियाणा निवडणुकीशी काय भूमिका? हा डेटा चोरला गेला नाही, तर थेट बदलला गेला आहे. या सर्वामागे कोण आहे, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
इतकंच नव्हे, तर राहुल गांधींनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या विधानाचा व्हिडिओ दाखवला. त्यामध्ये सैनी 'सिस्टम'चा उल्लेख करताना हसताना दिसतात. राहुल गांधी म्हणाले, "निवडणुकीनंतर दोन दिवसांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणतात 'ही सिस्टम काय आहे?' आणि त्यानंतर निकाल येतात, काँग्रेस हरते. हीच ती सिस्टम आहे जी मते चोरते." या सर्व आरोपांमुळे देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा 'निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकते'चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडून तत्काळ चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.


COMMENTS