नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली सोमवारी (ता. १०) स्फोटाने हादरली. स्फोटामध्ये ११ ठार तर ३० जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्...
नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली सोमवारी (ता. १०) स्फोटाने हादरली. स्फोटामध्ये ११ ठार तर ३० जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला असून, ताब्यात घेतलेला डॉ. उमर हा जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये सोमवारी सायंकाळी 6.52 वाजता स्फोट झाला. सदर प्रकरणी एएनआयकडून कसून तपास सुरु आहे. या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला असून, ताब्यात घेतलेला डॉ. उमर हा जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने जैश ए मोहम्मदला मोठा दणका दिला होता.
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटात सहभागी असलेल्या फरिदाबाद-सहारापूर जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलचे पुरावे गुप्तचर संस्थांना मिळाले आहेत. हरियाणा नोंदणी क्रमांक असलेली कार उमर मोहम्मदची होती, जो फरिदाबाद-सहारापूर जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंधित होता. कालच्या छाप्यानंतर दुसऱ्या ठिकाणी स्फोट घडवण्याचा विचार करत होते, परंतु लाल किल्ल्याजवळ चुकून स्फोटचं ट्रिगर दाबल्याने तिकडे स्फोट झाला. गुप्तचर अधिकाऱ्यांनी उमर मोहम्मदच्या काही सहकाऱ्यांची ओळख पटवली आहे आणि इतरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
फरीदाबादमधील कारवाईनंतर दिल्लीत स्फोट घडवल्याची तपास यंत्रणांना शंका आहे. त्यामुळे फरीदाबादमधून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तसंच 350 किलो स्फोटकंही जप्त करण्यात आली आहेत. यूपीचे डॉक्टर आदिलसह हरियाणाचे डॉक्टर मुजम्मिल यांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं…
1. दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशननजीकच्या सिग्नलजवळ कारमध्ये स्फोट
2. सोमवार 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.52 दरम्यान घटना घडली
3. स्फोट इतका भीषण की, साधारण 8 ते 10 कार आणि इतर वाहने जळून खाक
4. सायंकाळी 6.55 वाजता अग्निशमन दलाला स्फोटाची माहिती मिळाली
5. दिल्ली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल, नपासाला सुरुवात
6. लाल किल्ल्याभोवतीचा संपूर्ण परिसर, चांदणी चौक आणि रस्ते बंद
7. कारचा स्फोट कशामुळे झाला याबाबतचे अधिकृत कारण अद्याप अस्पष्ट
8. घटनेनंतर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती
9. रात्री 10 पर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, देशभरात हायअलर्ट जारी


COMMENTS