महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वाधिक चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ...
महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वाधिक चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याचं प्रकरण. या प्रकरणावरून राज्यात प्रचंड गदारोळ माजला आहे.
एका बाजूला विरोधक अजित पवारांना थेट जबाबदार धरत राजीनाम्याची मागणी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या कुटुंबातीलच व्यक्ती खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वाधिक चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याचं प्रकरण. या प्रकरणावरून राज्यात प्रचंड गदारोळ माजला आहे. एका बाजूला विरोधक अजित पवारांना थेट जबाबदार धरत राजीनाम्याची मागणी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या कुटुंबातीलच व्यक्ती खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे ४० एकर जमिनीचा १८०० कोटींचा व्यवहार केवळ ३०० कोटींना पार्थ पवार यांच्या कंपनीने विकत घेतला, असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी केला होता. या जमिनीच्या व्यवहारात केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचं उघड झाल्यानंतर हा मुद्दा थेट सत्तेच्या केंद्रबिंदूपर्यंत पोहोचला आहे.
या प्रकरणावर पार्थ पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटलं आहे "मी कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही. सर्व व्यवहार कायदेशीर मार्गाने आणि नियमांनुसार झाले आहेत." मात्र, अजित पवार स्वतः या विषयावर मौन बाळगत आहेत. त्यामुळे विरोधकांचा संशय अधिकच वाढला आहे.
पार्थ पवार प्रकरणात नवीन ट्विस्ट आला तो म्हणजे अजित पवारांच्या बहिणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेलं विधान. त्यांनी सार्वजनिकरित्या म्हटलं की "काहीतरी काळंबेरं आहे… काहीतरी गोलमाल आहे!"
त्यांनी पुढे एक अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केला "तहसीलदार आणि तलाठी यांची नोकरी गेली. पण ते म्हणत आहेत की आम्ही सही केली नाही. जर सहीच केलेली नसेल, तर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं का? तो गरीब आहे, आवाज नाही म्हणून त्याच्यावर अन्याय झाला. हा अन्याय नाही का?"
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेलाही प्रश्न केला. त्या म्हणाल्या "जर त्या जमिनीचा व्यवहार कायदेशीरच नव्हता, तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली? आणि तहसीलदारावरच कारवाई का झाली? सरकारच्या निर्णयांमध्येच विरोधाभास आहे. काहीतरी दाल मे काला आहे."


COMMENTS