रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआ...
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले.
तिसऱ्या दिवशीच्या सत्रात एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी यांनी एआय ट्रल्सला योग्य सूचना देण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर इंग्रजीचे मराठी भाषांतर, शीर्षक लेखन, संभाषण विश्लेषण आणि प्रॉम्प्ट लेखन याबाबतची सविस्तर माहिती दिली.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा प्रभावी वापर करून बातमी लेखनाची गुणवत्ता अधिक वाढविता येते. यासाठी या टूल्सना योग्य सूचना देणे आवश्यक आहे. एआय साधने ही कामाची गती आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी आहेत, असे मत एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी यांनी मांडले. एका बातमीसाठी विविध प्रकारची शीर्षके तयार करता येतात. यात छापील आवृत्तीचे शीर्षक, डिजिटल माध्यमासाठीचे शीर्षक, सर्च इंजिनसाठी अनुकूल शीर्षक, त्वरित लक्षवेधी शीर्षक या प्रकारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 'डीपसीक' हे टूल्स शीर्षक तयार करण्यासाठी प्रभावी असल्याचे श्री.जस्नानी यांनी प्रशिक्षणादरम्यान सांगितले.
तसेच या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढादेखील उपस्थित होते. जगभरात आता विविध क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमाने क्रांती घडत असून प्रसिद्धी माध्यमातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. 'एआय' तंत्रज्ञान अत्याधुनिक पत्रकारितेला नवा पैलू देत असून यामुळे पत्रकारांचा अमूल्य वेळही वाचणार आहे. प्रत्येक क्षेत्रात अपस्किलींगला खूप महत्त्व आहे हे लक्षात घेऊन राज्यात असा नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य विकास विभागाने राबविला असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात 'एआय' तंज्ञानाच्या वापरासंदर्भात आयोजित प्रशिक्षण सत्रात सांगितले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे तसेच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार या प्रशिक्षणाला उपस्थित होते.


COMMENTS