सोमवारी १० नोव्हेंबर रोजी दिल्ली लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये ९ जणांचा जीव गेला असून जखमींवर सध्या उपचार सुरू आहे. य...
सोमवारी १० नोव्हेंबर रोजी दिल्ली लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये ९ जणांचा जीव गेला असून जखमींवर सध्या उपचार सुरू आहे. या स्फोटाबद्दल अनेक महत्वाच्या बातम्या समोर येत आहेत. अशीच एक अत्यंत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. दिल्ली येथे झालेला स्फोट दहशतवाद्यांना दिल्लीमध्ये घडवायचा नव्हता. यांचे टार्गेट काही वेगळेच होते.
दिल्ली लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिल्ली स्फोटात काही डॉक्टरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली. फक्त हेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून या स्फोटाची पद्धतशीर योजना आखली जात होती. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली लाल किल्ला हे त्यांचे टार्गेट नसून त्यांचा प्लॅन यापेक्षाही कितीतरी पट खतरनाक असल्याचे आरोपींच्या चाैकशीतून पुढे आलं आहे. त्यांना जास्तीत जास्त लोकांना नुकसान पोहोचवायचे होते आणि त्यांची टार्गेट अयोध्या- वाराणसी होते. दिल्लीतील स्फोट घाईत झाल्याचे तपासात सांगण्यात आले आहे. तर स्फोटात वापरण्यात आलेले साहित्य हे बांगलादेश आणि नेपाळच्या मार्गे भारतात आणले गेले होते त्यामुळे मोठा कट दहशतवाद्यांकडून आखण्यात आला होता. दहशतवादी उमर हाच गाडी चालवत होता.
विविध ठिकाणांहून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासेसमोर आले आहेत. दहशतवाद्यांनी अयोध्या आणि वाराणसीतील राम मंदिराला टार्गेट केले होते. ज्याचे एक मॉड्यूल तयार केले गेले होते. तपासा दरम्यान हे स्पष्ट झाले की, या दहशतवाद्यांना दिल्ली नव्हे तर अयोध्येत स्फोट घडवायचा करायचा होता. अटक करण्यात आलेली शाहीन हिने अयोध्येत स्लीपर मॉड्यूल सक्रिय केले होते. हल्ला करण्यापूर्वीच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांची स्फोटकेही जप्त करण्यात आली.
त्यामुळे आतापर्यंतच्या तपासातून असे दिसून येते की, स्फोटकांमध्ये कोणताही टायमर नव्हता. हा स्फोट घाईघाईत झाला. दहशतवाद्यांनी चाैकशीत सांगितले की, त्यांना स्फोट जास्तीत जास्त लोक असलेल्या ठिकाणी उडवायचा होता. सुरक्षा एजन्सींसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे की, उर्वरित ३०० किलो अमोनियम नायट्रेट त्यांना जप्त करायचा आहे. याकरिता दहशतवाद्यांकडून कसून चाैकशी केली जात आहे. दहशतवाद्यांनी हे लपून ठेवले आहे.
तसेच एजन्सीने आतापर्यंत २९०० किलो स्फोटके जप्त केली आहेत. ही स्फोटके जप्त करण्यासाठी सतत छापेमारी केली जात आहे. दिल्लीत स्फोट करण्यात आलेल्या i-२० कार दिल्लीत कुठे कुठे गेली होती, याचा शोध घेतला जात आहे. गाडीत स्फोटके नेमकी कुठे भरण्यात आली, याचा शोध सुरू आहे. तीन तास जवळपास लाल किल्ल्याजवळीला पार्किंगमध्ये ही गाडी उभी होती.


COMMENTS