पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; पुण्यातील तहसीलदारांचे निलंबन. | CrimeNama
Loading ...

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; पुण्यातील तहसीलदारांचे निलंबन.

  एकीकडे राज्यातील स्थानिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यां...

 


एकीकडे राज्यातील स्थानिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे.

पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमीन खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई झाली असून पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.


अंबादास दानवेंचा आरोप काय?


पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधल्या या जवळपास 40 एकर जमिनीची किंमत आहे किमान 1800 कोटी आहे. मात्र पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने ही जमीन फक्त 300 कोटी रुपयांत विकत घेतली आणि या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. एवढेच नव्हे तर ही जमीन कोरेगाव पार्क परिसरात असून, तिथे आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची योजना करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी एवढा मोठा व्यवहार कसा करू शकते? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्योग संचालनालयाने फक्त 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आणि फक्त 27 दिवसांत संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्याचा त्यांनी आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान जमीन व्यवहार प्रकरणाची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी योग्य ते चौकशीचे आदेश दिले आहे.


या प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,78,Amaravati,14,Aurangabad,30,Breakin,1,Breaking,3479,Buldhana,15,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1006,Dhule,12,Entertainment,54,Gadchiroli,5,Health,449,India,427,Jalgaon,29,Jalna,13,Kolhapur,21,Lifestyle,286,Maharashtra,1613,Mumbai,388,Nagpur,39,Nashik,53,Politics,587,Pune,1817,Raigad,23,Ratnagiri,19,Sangali,27,Satara,45,Sindhudurg,5,Solapur,35,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; पुण्यातील तहसीलदारांचे निलंबन.
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; पुण्यातील तहसीलदारांचे निलंबन.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEirx8azlQEZ0Q-Ofa3UC0EBLMI9UORGO22ojnUb-MGBVt2iZo8yVFPhxJBzctH6-0zdtoX1Ds8_GQAgZYQZ_PTf-JIk7VtntDWMi3fxi3OLGjWM_n5vSEOtTFDjWiqrPV8DO5-7qDFzSYh5atYtWO17rhsNdd10Fn-VbnVRMCJUzPbKV_HyKqeTlye7MxM/s320/1001481574.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEirx8azlQEZ0Q-Ofa3UC0EBLMI9UORGO22ojnUb-MGBVt2iZo8yVFPhxJBzctH6-0zdtoX1Ds8_GQAgZYQZ_PTf-JIk7VtntDWMi3fxi3OLGjWM_n5vSEOtTFDjWiqrPV8DO5-7qDFzSYh5atYtWO17rhsNdd10Fn-VbnVRMCJUzPbKV_HyKqeTlye7MxM/s72-c/1001481574.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/11/blog-post_11.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/11/blog-post_11.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content