महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा धुमाकूळ - "मनसे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जाणार?" या चर्चेने सगळीकडे खळबळ उडव...
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा धुमाकूळ - "मनसे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जाणार?" या चर्चेने सगळीकडे खळबळ उडवली आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर "नमो पर्यटन केंद्र" स्थापनेवर जोरदार टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.
पण त्यानंतरच शिंदे गटाने थेट पलटवार करत "राज ठाकरे आता उबाठात विलीन होणार आहेत" असा दावा करत राजकीय वातावरण तापवले आहे.(Maharashtra Politics)
शिंदे सेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खळबळजनक दावा केला. त्यांनी म्हटलं की, "मनसे उबाठात विलीन होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं आहे." याच पुराव्यासाठी वाघमारे यांनी सामना वृत्तपत्रातील छायाचित्र दाखवत म्हणाले - "या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आसनाच्या अग्रभागी आहेत आणि राज ठाकरे मात्र एका कार्यकर्त्यासारखे मागे बसले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे - नेतृत्व स्वीकृती झाली आहे."(Maharashtra Politics)
याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनीही राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला. "राज ठाकरे यांनी उबाठात सामील व्हावं, आता थांबण्याची वेळ आली आहे. शिंदेंवर टीका करणं ही नवीन गोष्ट नाही; पण महाराष्ट्राने शिंदे यांनी दाखवलेली हिंमत पाहिली आहे. त्यांच्या ताकदीचा आम्हाला गर्व नाही, अभिमान आहे," असे शिरसाट म्हणाले.(Maharashtra Politics)
दरम्यान, या सर्व वादाच्या मुळाशी आहे राज ठाकरे यांचा "नमो पर्यटन केंद्र" योजनेवरील संताप. राज म्हणाले होते "आपला स्वाभिमान किती गहाण टाकायचा? मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभागाने 'नमो पर्यटन केंद्र' काढलंय, पण हे पंतप्रधानांनादेखील ठाऊक नसेल. सत्ता डोक्यात गेली की असं होतं! मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"(Maharashtra Politics)
त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे सेनेने राज ठाकरेंवर जोरदार पलटवार केला असून, आता "मनसे उबाठात जाणार का?" हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. राजकीय सूत्रांच्या मते, या घडामोडींनी राज्यातील विरोधकांच्या समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो.(Maharashtra Politics)


COMMENTS