पुणे : पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या तब्बल ३२२ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त ...
पुणे : पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या तब्बल ३२२ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त कार्यालयाने ही भरती प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलिस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर 322 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. शहराची कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ही भरती प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जाहीर झालेल्या एकूण ३२२ पदांचे वाटप विविध प्रवर्गांनुसार (Reservation Category) करण्यात आले आहे. आरक्षणाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत…
जनरल (General) प्रवर्गासाठी: ९७ जागा
महिला (Women) प्रवर्गासाठी: ९७ जागा
माजी सैनिक (Ex-Servicemen): सर्वाधिक ४८ जागा
खेळाडू (Sports Persons): १६ जागा
प्रकल्पग्रस्त (Project Affected): १६ जागा
गृह रक्षक (Home Guards): १६ जागा
अंशकालीन पदवीधर : १६ जागा
पोलिस कॅडेट्स (Police Cadets): १० जागा
भूकंपग्रस्त (Earthquake Affected): ६ जागा


COMMENTS