मुंबईः अभिनेते धर्मेंद्र यांना 12 दिवसानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार हे त्यांच्या घरी केले जाणार...
मुंबईः अभिनेते धर्मेंद्र यांना 12 दिवसानंतर रुग्णालयातून
घरी सोडण्यात आले आहे. धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार हे त्यांच्या घरी केले जाणार असल्याची माहिती ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी दिली.
अभिनेते धर्मेंद्र यांना रुटीन चेकअपसाठी 30 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण काही दिवसांत त्यांची प्रकृती आणखी बिघडली. पण, आता प्रकृती सुधारल्याने घरी सोडण्यात आले आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयाने सांगितले की, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आज (बुधवार) सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 89 वर्षीय धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पुढील उपचारांसाठी घरी नेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं वृत्त समोर येताच चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीबाबत सगळेच चिंता व्यक्त करत होते.
धर्मेंद्र यांच्या मृत्यूची खोटी माहिती पसरवण्यात आली होती. सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या मृत्यूची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर त्यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली होती. ईशाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "मीडिया अफवांचा वेगाने प्रसार करत आहे. माझे वडील ठीक आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. आमच्या कुटुंबाला कृपया थोडी प्रायव्हसी द्या ही नम्र विनंती. पप्पा लवकर बरे व्हावे यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार."


COMMENTS