ठाणे : भिवंडीतील एका व्यक्तीला अनोळखी नंबरवरून RTO Challan नावाची फाइल आली होती. त्यानंतर आरटीओकडून चालान आल्याचे गैरसमज झाल्याने त्याने त...
ठाणे : भिवंडीतील एका व्यक्तीला अनोळखी नंबरवरून RTO Challan नावाची फाइल आली होती. त्यानंतर आरटीओकडून चालान आल्याचे गैरसमज झाल्याने त्याने ती फाइल आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केली. मात्र, ही फाइल डाउनलोड होताच फसवणूक करणाऱ्यांना त्याच्या मोबाईलवर पूर्णपणे रिमोट अॅक्सेस मिळाला.
त्यानंतर त्यांनी त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यांमधून 3.2 लाखांची फसवणूक झाली.
पीडित व्यक्तीला काही वेळानंतर बँक व्यवहारांचे अलर्ट मॅसेज येऊ लागल्याने संशय आला. आपले बँक खाते तपासले असता त्यातल्या मोठ्या रकमांचे व्यवहार झाल्याचे लक्षात आले. या प्रकारानंतर त्याने लगेच जवळच्या पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेली एपीके फाइल ही अत्यंत घातक प्रकारातील असून ती इन्स्टॉल होताच मोबाईलवरील सर्व माहिती जसे की बँक अॅप्स, ओटीपी, पासवर्ड आणि इतर संवेदनशील डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचवते. सायबर गुन्हेगारांनी या डेटाचा वापर करून विविध खात्यांमधून सर्व पैसे काढले जातात.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सायबर सेल या घटनेचा पुढील तपास करत आहे. आरटीओकडून चालान आल्याचा भास निर्माण करून फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


COMMENTS