पुणे शहरामध्ये एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक. | CrimeNama
Loading ...

पुणे शहरामध्ये एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक.

  पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंज...

 


पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५, रा. कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या एका मित्रालाही संशयाच्या आधारे पुणे रेल्वे स्थानकावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.


जुबेर हंगरगेकर याच्याकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे. हंगरकेकर जवळ अल कायदा इन्स्पायर मासिकातील एके 47 रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचे छायाचित्र व माहिती आढळून आली आहेत. जुबेरच्या संपर्कात कोणी आहे का आणि आणखी कोणाला अल् कायद्याचे सदस्य होण्यासाठी त्याने माहिती दिली आहे का? याचा तपास एटीएस कडून केला जात आहे. जुबेर हंगरगेकर उच्चशिक्षित असून आयटी कंपनीत लाखो रुपयांचे पॅकेज तो घेतो.


एटीएस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील विविध ठिकाणी ९ ऑक्टोबर रोजी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईदरम्यान १९ लॅपटॉप आणि ४० मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तपासादरम्यान जुबेर हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये अल-कायदा संघटनेशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले असून, असे साहित्य डाउनलोड करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जप्त केलेल्या सर्व उपकरणांचे सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू असून, त्यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


पुणे न्यायालयाने आरोपी जुबेर हंगरगेकर याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा असून, सध्या कल्याणीनगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतो. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, तसेच त्याचे कुटुंब कोंढवा परिसरात राहते. पोलिसांकडून त्याच्या मित्राचीही चौकशी केली जाणार असून, त्याच्याकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जाईल. तसेच तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का, हेही तपासले जात आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3759,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1229,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,550,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,296,Maharashtra,1703,Mumbai,412,Nagpur,49,Nashik,57,Politics,605,Pune,1872,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: पुणे शहरामध्ये एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक.
पुणे शहरामध्ये एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgB1PoWlTIE1VrPE8QMmBuR8QYplz6itD8s9tRZWNfBRAocCRovlpoGOTPH62Ue9ZE4vRN6COqMbDNVbS2BDrMO-gPVlkadHScp7ks9zqE4902O-SWZi-Yt7iQFJbEjUqFyqDBO3uMswAOvzNS8v9Hruc2YzgO2J3IFPg9bLUv4TAYDkPWUkxhAQyQ6Eoo/s320/1001445722.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgB1PoWlTIE1VrPE8QMmBuR8QYplz6itD8s9tRZWNfBRAocCRovlpoGOTPH62Ue9ZE4vRN6COqMbDNVbS2BDrMO-gPVlkadHScp7ks9zqE4902O-SWZi-Yt7iQFJbEjUqFyqDBO3uMswAOvzNS8v9Hruc2YzgO2J3IFPg9bLUv4TAYDkPWUkxhAQyQ6Eoo/s72-c/1001445722.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/10/it.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/10/it.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content