पुण्यातील शनिवार वाडा हा पेशव्यांच्या यशाचा आणि र्हासाचा साक्षीदार आहे. शनिवार वाडा हा ऐतिहासिक वाडा म्हणून ओळखला जातो. पेशवेकाळापासून अस...
पुण्यातील शनिवार वाडा हा पेशव्यांच्या यशाचा आणि र्हासाचा साक्षीदार आहे. शनिवार वाडा हा ऐतिहासिक वाडा म्हणून ओळखला जातो. पेशवेकाळापासून असलेला हा वाडा गेली वर्षानुवर्षे या वास्तूचे जतन केले जात आहे.
परंतु ऐतिहासिक देणगी लाभलेला हा वाडा सध्या एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत आला आहे. काही महिलांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केल्यामुळे वाद सुरु झाला आहे.
पुण्यातील शनिवार वाडा हा पेशव्यांच्या यशाचा आणि र्हासाचा साक्षीदार आहे. शनिवार वाडा हा ऐतिहासिक वाडा म्हणून ओळखला जातो. पेशवेकाळापासून असलेला हा वाडा गेली वर्षानुवर्षे या वास्तूचे जतन केले जात आहे. परंतु ऐतिहासिक देणगी लाभलेला हा वाडा सध्या एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत आला आहे. काही महिलांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केल्यामुळे वाद सुरु झाला आहे.
पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण करण्यात आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी शनिवार वाड्यात मोठा राडा झाला. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनेकडून आंदोलन करत नमाज पठणाचा निषेध कऱण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं त्या ठिकाणी हिंदूत्ववादी संघटनेकडून शुद्धीकरण म्हणजेच गोमूत्र शिंपडण्यात आलं. तसेच पतीत पावन संघटनेकडून शिववंदन करण्यात आलं. तसेच यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नसल्याचा इशारा मेधा कुलकर्णींनी दिला. हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहेत. त्यावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नमाज पडायला यांना दुसरीकडे जागा नाही का? उद्या आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हाजी अलीला जाऊन हनुमान चालीसा म्हटले तर तुम्हाला चालेल का? शनिवार वाडा हे आमच्यासाठी हिंदू समाजाचे प्रतीक असलेले धार्मिक स्थळ आहे. तिथे जर तुम्ही नमाज पठण करत असाल तर उद्या हाजी अलीला आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसाचे पठण सुरू केले तर मग काय करायचे? जो न्याय तुम्ही हाजी अलीला लावता तोच अन्य धार्मिक स्थळांना देखील लावा. वातावरण कोण खराब करत आहेत? कशाला तिथे नमाज पडायचे आहे. नमाज पडण्यासाठी देशात आणि राज्यात जागा कमी आहे का? वातावरण खराब करणारे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत. मग हिंदू संघटनांनी आवाज उचलला तर त्यात चूक काय? जो आवाज आमच्या कार्यकत्यांनी उचलला तो बरोबर आहे, असे नितेश राणे यांनी मेधा कुलकर्णी यांची बाजू घेत शनवार वाड्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.


COMMENTS