फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय. | CrimeNama
Loading ...

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय.

  मुंबई: फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाचा ...

 


मुंबई: फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण प्रकरणात महिला आयपीएस अधिकार्‍यांच्या नेतृत्त्वात एसआयटी गठीत करा, असे आदेशच पोलिस महासंचालकांना दिले आहे.

महिला डॉक्टर आत्महत्येचा तापस हा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून करण्यात येणार आहे.


सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या महिला डॉक्टरने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. मृत महिला डॉक्टरने मृत्यूआधी हातावर पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर या दोघाच्याा नावाचा उल्लेख केला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर यांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पीएसआय बदने याला निलंबित करण्याचे आदेश दिले होते. तसेच, फलटण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले होते.


दरम्यान, या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे दोन पीए, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर आरोप करण्यात आला. गोपाळ बदनेने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव आल्याची तक्रारही तिने केली होती. या प्रकरणात अनेक नावांचा समावेश असल्याने, त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली. सातारा पोलिसांनी याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो, त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर आरोपांची राळ उठवली. या प्रकरणात त्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच महिला डॉक्टरची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा करत त्यांनी एसआयटी चौकशीच मागणी केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाणार आहे.


फलटण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3786,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1248,Dhule,12,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,450,India,565,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,299,Maharashtra,1711,Mumbai,416,Nagpur,49,Nashik,58,Politics,607,Pune,1875,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,65,Technology,33,World,67,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय.
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj77RO_r4kDx7A_bWFuUWpN8wNFixD3nbIBZHkezwKxI9CRSR2cMknZqUGIu-L0lSyTVVLuzC5ZE3HK3y8PyGFoy4l4PlEnSCUkUnR5jfx1ZnpCli-IcIT56GievKFxHY4RB4xAct6yc-SOWrkzBCrdiZT3GGf2pv8W1ZBwRCOL4zYUlAfO8QgIiCbKgE4/s320/1001456810.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj77RO_r4kDx7A_bWFuUWpN8wNFixD3nbIBZHkezwKxI9CRSR2cMknZqUGIu-L0lSyTVVLuzC5ZE3HK3y8PyGFoy4l4PlEnSCUkUnR5jfx1ZnpCli-IcIT56GievKFxHY4RB4xAct6yc-SOWrkzBCrdiZT3GGf2pv8W1ZBwRCOL4zYUlAfO8QgIiCbKgE4/s72-c/1001456810.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_866.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_866.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content