जुन्नर : जुन्नर तालुक्यातील मुख्य दळणवळणाचे ठिकाण म्हणजे जुन्नर बस स्थानक याचं बस स्थानकात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पहायला मिळतं...
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील मुख्य दळणवळणाचे ठिकाण म्हणजे जुन्नर बस स्थानक याचं बस स्थानकात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पहायला मिळतं आहे, यात प्लास्टिक पिशव्या, ग्लास आणि इतर कचरा मोठया प्रमाणात झालेला असून प्रवाशांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एअरनीवर आला आहे, या कचऱ्यामुळे बस स्थानकात मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरली असून घुशी व उंदीर देखील या घाणीमुळे झाले आहेत, शौचालयामध्ये पाणी देखील नसल्याने त्याची पण मोठी दुर्गंधी पसरली असून यामुळे मोठया प्रमाणात डासांची पैदास झाली असून प्रवाशांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतं आहे, जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकं व बाहेरील पर्यटक मोठया संख्येने तालुक्यातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येत असतात त्यामुळे वास्तविक त्यांच्या आरोग्याशीच हा खेळ सुरू आहे, यावर बस स्थानक प्रशासन व स्वछता विभागाने तातडीने लक्ष द्यावे एवढीच माफक अपेक्षा.


COMMENTS