पुणेः पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाणे हद्दीत सणासुदीच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर चोरट्...
पुणेः पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाणे हद्दीत सणासुदीच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिस दुर्लक्ष करत असल्याची तक्रार महिलेने केली आहे.
पुणे शहरातील रविवार पेठ परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलांकडून पर्स, मोबाईल फोन व दागिन्यांची चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी चोरटे महिलांच्या नकळत चोरी करून पसार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोरीचा व्हिडिओ पोलिसांना दिल्यानंतरही पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जात नाही. चोरणारी महिला तुम्हाला दिसल्यास आम्हाला कळवा, सीसीटीव्ही फुटेज तुम्हीच तपासून आम्हाला आणून द्या, आमच्याकडे सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, अशी उत्तरे पोलिसांकडून दिली जातात. फरासखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी फोन उचलला नाही. यामुळे तक्रार दाखल करूनही चोरीच्या वस्तू मिळणार की नाही, हे अनुत्तरीत असल्याचे महिलेने सांगितले.
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलल्याने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत गुन्हेगार सक्रिय झाले असून पोलिसांकडून देखरेख वाढविण्याची गरज भासत आहे. फरासखाना पोलिस ठाण्याचे पथक या चोरीच्या घटनांचा तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक खबर्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी खरेदीसाठी बाहेर पडताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


COMMENTS