मुंबईः पवई येथील RA स्टुडिओमध्ये रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने 17 मुलांना ओलीस ठेवले होते. शॉर्टफिल्मच्या ऑडिशनच्या निमित्ताने मुलांना...
मुंबईः पवई येथील RA स्टुडिओमध्ये रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने 17 मुलांना ओलीस ठेवले होते. शॉर्टफिल्मच्या ऑडिशनच्या निमित्ताने मुलांना बोलावून एका खोलीत डांबून ठेवले होते. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला.
त्यात त्याचा मृत्यू झाला. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मराठीतील काही प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री RA स्टुडिओला आले होते. प्रसिद्ध अभिनेत्री रुचिता जाधव हिने देखील धक्कादायक खुलासा केला आहे.
पवईतील प्रकरणात रोहित आर्य याने स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचे सांगत मराठी अभिनेत्रींसोबत संपर्क साधला होता. अभिनेत्री रुचिता जाधव हिच्याशीही त्याने संपर्क साधला होता. रुचिता जाधवनं स्वतः सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे. Instagram स्टोरीद्वारे, हा संपूर्ण प्रकार उघड केला. तिच्या या पोस्टनंतर या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली असून इतर अभिनेत्रींपर्यंतही या व्यक्तीने अशाच प्रकारे संपर्क साधल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रुचिताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित सांगितले की, 2010 साली एक सिनेमा केला होता. त्याच्या स्टुडिओमध्ये मी डबिंग करायला गेली होती. तेव्हा रोहित आर्याशी ओळख झाली होती. 2010-11ची गोष्ट आहे ही. तेव्हा ते प्रोड्यूसर आहे, लिहितो असे इंट्रोड्युस करण्यात आले होते. त्यानंतर नंबर एक्सचेंज झाले होते. त्यानंतर काहीच संपर्क झाला नाही. मला माहिती होतं की ते गव्हरमेन्टचे सिनेमे आणि प्रोजेक्ट करतात. 4 ऑक्टोबरला मला त्यांचा मेसेज येतो. मी फिल्म करतोय. दुपारी 2.52 ला त्याने मेसेज केला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास मी त्यांना रिप्लाय केला मी आता फ्री आहे आपण फोनवर केव्हा बोलायचं. तेवढ्यात त्यांनी मला 7.15 ला पिंग केला मी फ्री आहे. मी त्यांना फोन केला. नऊ मिनिटांचा फोन कॉल केला.
त्यांनी मला स्टोरी सांगितली की, एक इनोसंड माणूस असतो. नसीरुद्दीन शाहची वेनस्टडेची स्टोरी आहे तिच आपल्याला करण्याचा प्रयत्न करतोय. तो पिक्चर आहे असे मला सांगितलं. तो माणूस प्रचंड इनोसेंट असतो. तो काही मुलांना होस्टेस ठेवतो. त्याच्या काही डिमांड असतात. पण तो माणूस खूप चांगला असतो. मी त्याला विचारलं की माझा रोल काय असतो. एक तर ती टिचर किंवा एक पॅरेंट जो किडनॅपरचा मेसेज पोलिसांपर्यंत पोहोचवतील.
मला या गोष्टीचा अंदाज आला नव्हता. तो बोलताना खूप सेन्सिबल वाटत होता. त्याच्याकडे संपूर्ण स्टोरी लिहिलेली होती. असे अनेक फोन येतात जे फोनवर नरेशन देतात. नंतर म्हणतात की, आपण भेटूया. त्यांनी मला 23 ऑक्टोबरला मेसेज केला होता की, 27-28-29 मध्ये भेटायला जमेल का? त्यातील मी 28 तारीख सांगितली होती. त्याने मला या सोमवारी मेसेज केला आपण मंगळवारी तू मला भेटू शकते का RA स्टुडीओला. त्याने मला लोकेशन पाठवले होते. माझ्या सासऱ्यांची तब्येत ठीक नव्हती. ते अँडमिट होते त्यामुळे जाऊ शकले नाही. मी त्यांना मेसेज केला की मी येऊ शकले नाही. आपण 15 नोव्हेंबरनंतर भेटूयात.
रूचिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आज 31 ऑक्टोबरला, जेव्हा मी या व्यक्तीशी संबंधित भीषण घटनेची बातमी पाहिली तेव्हा मला भीती वाटली. मी किती जवळ पोहोचले होते. मी देवाचे, माझ्या कुटुंबाचे अत्यंत आभारी आहे. मला खरंच वाटतं की वर कुणीतरी माझं संरक्षण करत होतं. या घटनेने मला लक्षात आलं आणि मला आशा आहे की तुमच्याही हे लक्षात येईल. नवीन लोकांशी कामासाठी भेटताना अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे, जरी सर्व काही सामान्य वाटत असेल तरी. कृपया सुरक्षित राहा, तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, आणि नेहमी तुमच्या भेटींची माहिती कुटुंब किंवा मित्रांशी शेअर करा प्रेम आणि काळजी व्यक्त करणाऱ्या सर्व लोकांचे धन्यवाद."


COMMENTS