पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात पत्नीने चारित्र्याच्या संशयावरून पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती सामाजिक कार्यकर्ता होता तर पत्न...
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात पत्नीने चारित्र्याच्या संशयावरून पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती सामाजिक कार्यकर्ता होता तर पत्नी आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे.
नकुल भोईर असे खून झालेल्या सामजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. नकुल भोईर हा पत्नी चैत्राली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. यावरून काल सायंकाळी दोघांत यावरून वाद झाला होता, रात्री देखील नकुलचा आणि पत्नीचा वाद झाला त्या वादात नकुलच्या पत्नीने ओढणीने गळा दाबून हत्या केली. आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड भागात नकुल भाईर यांचा मोठा जनसंपर्क होता. नकुल भोईर हे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि विविध सामाजिक चळवळीत सक्रिय होते. चिंचवडगाव आणि शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. अशा सामाजिक कार्यकर्त्याचा मध्यरात्री अचानक खून झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चिंचवड परिसरातील त्यांच्या राहत्या घरी घडली आहे. नकुल भाईर यांचा खून त्यांच्या पत्नीने केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या पत्नीने नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी, यासाठी पती पत्नी दोघांनी मोठी तयारी केली होती. नगरसेवक बनण्याचं स्वप्न होतं, त्या पत्नीने नकुल यांची हत्या केली आहे. नकुल भाईर आणि त्यांची पत्नी चैताली भाईर यांच्यामध्ये वारंवार वाद सुरू होते. रात्री उशिरा नकुल आणि त्यांची पत्नी यांच्यात पुन्हा वाद झाले आणि रागाच्या भरात पत्नी चैतालीने ओढणीने गळा आवळून नकुलचा खून केला आहे. पोलिसांनी चैताली भाईरला तत्काळ ताब्यात घेतले असून, तिची कसून चौकशी सुरू आहे. नेमका वाद कोणत्या कारणावरून विकोपाला गेला, याबद्दल पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुल भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. परंतु, शुक्रवारी पहाटे झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. नकुल आणि चैताली यांच्यात वाद झाले. चैताली हिने ओढणीनं गळा दाबून हत्या केली. दोन आणि पाच वर्षांची मुलं आतील रूममध्ये झोपली होती. तेव्हा हा सर्व थरार बाहेरच्या रूममध्ये सुरू होता. नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय होता. असे असताना नेहमीच्या वादातून आणि सतत चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीची हत्या केली आहे. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलिस घेत आहेत.


COMMENTS