आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यात निवडणुकीची तयार...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यात निवडणुकीची तयारी जोर धरू लागली आहे. कोकणात देखील निवडणुकीचे पडसाद उमटताना दिसत आहेत.
रत्नागिरीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये महायुतीत या निवडणुका स्वबळावर लढवणार की युती म्हणून याबद्दल दोन्ही गटांत मतभिन्नता दिसून आली. आज सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी कोकणातील निवडणुकांसंदर्भात वक्तव्य केले.
सिंधुदुर्ग येथे निवडणूक कशी लढवणार या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले,"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढविल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी राजकीय पक्ष त्या मूडमध्ये गेले आहेत. आम्ही प्रत्येक जण स्वबळावर निवडणुका लढण्याच्या तयारीला लागलेले आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे. शिवसेना-भाजप मध्ये युती करून आम्ही बंडखोरीला का प्रोत्साहन देऊ? कणकवलीचे उदाहरण बघितलं तर उबाठाकडे निवडणुका लढविण्यासाठी उमेदवार आहेत का? महाविकास आघाडीची ५०चे ५० उमेदवार उभे करण्याची क्षमता आहे का? ते कितीही आव आणत असतील. त्यामुळे महायुती मैत्रीपूर्ण निवडणूक लढवेल आणि निवडणुकीनंतर एकत्र सत्ता स्थापन करेल. दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी आहे, त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहे. जर शिवसेनेची स्वबळावर लढायची तयारी असेल, भाजपची तयारी असेल मग वेळ न लावता कामाला लागलं पाहिजे."
काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे महायुती म्हणून आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत पण भाजपच्या काही स्थानिक नेत्यांना स्वबळाची खुमखुमी आहे. त्यांना जर अशी खुमखुमी असेल तर आम्ही शिंदे गटाची ताकद दाखवून देऊ असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, "उदय सामंत यांना ताकद दाखवायची इच्छा असेल, तर ती त्यांनी दाखवावी. आम्हाला देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे काय बोलतात हे आमच्या साठी महत्वाचे आहे. या संदर्भात आमची प्रदेश कार्यालयात बैठक झाली आहे. भांड्याला भांड लावणं आमचं काम नाही. जनतेला विकास हवा आहे. आमच्या नेत्यांचा निर्णय झाला आहे, त्यानुसार आमचा कार्यकर्ता कामाला लागला आहे. आम्हाला आमच्या नेत्यांनी स्वबळावर निवडून लढण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार आम्ही कामाला लागलो आहोत. किंवा मैत्रीपूर्ण लढत घ्यायचीय तर तसं काम करतोय. सरळ सोपा विषय आहे."
तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत विचारले असते या संदर्भात पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्याच्या माध्यमातून सर्व माहिती घेण्याचे काम सुरू आहे. भात पीक नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. फळपीक विम्याची ९० कोटी रक्कम ४३ हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी वाटप झाली आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यात निवडणुकीची तयारी जोर धरू लागली आहे. कोकणात देखील निवडणुकीचे पडसाद उमटताना दिसत आहेत. रत्नागिरीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये महायुतीत या निवडणुका स्वबळावर लढवणार की युती म्हणून याबद्दल दोन्ही गटांत मतभिन्नता दिसून आली. आज सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी कोकणातील निवडणुकांसंदर्भात वक्तव्य केले.


COMMENTS