महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण. | CrimeNama
Loading ...

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण.

  सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुसाईड न...

 


सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये नाव असलेला प्रमुख आरोपी पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदणे याने सरेंडर करण्यापूर्वी या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा लपवल्याची माहिती पुढे येत असल्यामुळे पोलिस तपासात मोठे अडथळे निर्माण होताना दिसत आहेत.

डॉक्टरच्या आत्महत्येमागे पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर या दोघांचा हात असल्याचा उल्लेख डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला होता. पीएसआय बदणे याने आपल्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केला तर प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचे नोटमध्ये लिहिले होते. आता पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, तपासादरम्यान पीएसआय गोपाल बदणे याने अत्यंत महत्त्वाचा पुरावा असलेला त्याचा मोबाईल लपवल्याची माहिती समोर आली आहे.


आरोपी पीएसआय बदणे याने पोलिस ठाण्यात सरेंडर करण्यापूर्वीच आपला मोबाईल फोन लपवला आहे. हा मोबाईल कुठे आहे, याची माहिती तो पोलिसांना देत नाही. हा मोबाईल या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा असल्याने आता पोलिस या मोबाईलचा शोध घेत आहेत.


महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी, दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात होते, याची कबुली पीएसआय बदणे याने पोलिसांना दिली. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी आरोपी बदणे याचे दुसरा आरोपी प्रशांत बनकर याचं व्हॉट्सअॅप कॉलवरून बोलणे झाल्याची माहिती समोर आली होती. आता त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं? याचा खुलासा होऊ शकला नाही. यासाठी बदणेचा मोबाईल अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. या सर्व संभाषणाचे आणि संपर्काचे डिटेल्स आरोपीच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पीएसआय बदणेचा मोबाईल जप्त करणे पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,78,Amaravati,14,Aurangabad,30,Breakin,1,Breaking,3479,Buldhana,15,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1006,Dhule,12,Entertainment,54,Gadchiroli,5,Health,449,India,427,Jalgaon,29,Jalna,13,Kolhapur,21,Lifestyle,286,Maharashtra,1613,Mumbai,388,Nagpur,39,Nashik,53,Politics,587,Pune,1817,Raigad,23,Ratnagiri,19,Sangali,27,Satara,45,Sindhudurg,5,Solapur,35,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgm2-Qm4o87vQt5evTH2xkYsoatBNIA9NERPaSE3ueUgZqeXC5y_4qCLw6lphwWhv641TicgEfRDBdb1FxtmyUv9A_Z_v47NRZMQ9x_sbPXrMzx2_cbWoGo_pBOxoC95_ca5PE7vZGzhf88Pob3azWnUG0kKXvGV4mS00i3XDCWF1YPX5_wtH_SsTj4Zwc/s320/1001442521.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgm2-Qm4o87vQt5evTH2xkYsoatBNIA9NERPaSE3ueUgZqeXC5y_4qCLw6lphwWhv641TicgEfRDBdb1FxtmyUv9A_Z_v47NRZMQ9x_sbPXrMzx2_cbWoGo_pBOxoC95_ca5PE7vZGzhf88Pob3azWnUG0kKXvGV4mS00i3XDCWF1YPX5_wtH_SsTj4Zwc/s72-c/1001442521.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_63.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_63.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content