नाशिक: एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...
नाशिक: एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आपण तीन वर्षांपूर्वी आत्महत्या करणार होतो.
पण गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्षे जगायला मिळाली, अशा आशयची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून युवकाने जीवन संपवले आहे. युवक शिक्षणात ९५ टक्के मार्क्स मिळाले होते. हुशार विद्यार्थ्याने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याने शनिवारी (ता. ४) सकाळी साडेआठ वाजता गंगापूर रोड परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. या प्रकारानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र मध्यरात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. युवकाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
मृत युवक त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबासोबत तो पाथर्डी फाटा परिसरात राहत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. काही दिवसांपूर्वीच त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेतला होता. त्याला ९५ पेक्षा अधिक टक्के होते. अशा गुणवंत विद्यार्थ्याने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली आहे.
'हाय, गाइज तुम्ही मला शेवटचं ऐकत आहात. आयुष्यातील माझा इंटरेस्ट संपला आहे. माझ्या आयुष्यात ध्येय किंवा स्वप्नं शिल्लक राहिली नाहीत. माझ्यामुळे अनेकांना त्रास झालाय. तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो. पण माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगायला मिळाली. तुम्हा सर्वांना माहिती आहे, मी शाळेपासूनच त्रासात आणि निराशेत आहे. सो, मी आता तेच करणार आहे. जे माझ्या आयुष्यात होते, त्या सर्वांना धन्यवाद. माझे कुटुंब, मित्र आणि हितचिंतक सर्वांना 'लव्ह यू'. सो, साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ, गूड बाय. सर्वांचे आणि पालकांचे प्रयत्न मी वाया घालवल्याबद्दल व्हेरी व्हेरी सॉरी. तुम्ही काही चुकीचं केलं नाही, मी त्यासाठी पात्र नव्हतो…' या आशयाची पोस्ट त्याने लिहिली होती.


COMMENTS