मुंबई : मुंबईच्या काळाचौकी परिसरात एका युवकाने युवतीवर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या केली आहे. हल्यात जखमी झालेल्या युवतीचाही उपचारादरम्यान...
मुंबई : मुंबईच्या काळाचौकी परिसरात एका युवकाने युवतीवर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या केली आहे. हल्यात जखमी झालेल्या युवतीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मृत युवकाचे नाव सोनू बरई तर मृत युवतीचे नाव हे मनिषा यादव आहे.
दोघांमध्ये प्रेमसंबध होते. मात्र, मृत युवक वारंवार मुलीवर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये ८ दिवसापूर्वी वाद झाला होता. शिवाय, दोघांचे ब्रेकअप झाले होते. युवकाने शेवटचं भेटण्यासाठी युवतीला बोलवले होते. यावेळी दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर युवकाने किटचेन कनिफेने युवतीवर वार केले. युवती जीव वाचवण्यासाठी नर्सिंग होममध्ये घुसली. त्यावेळेला तिथे सुद्धा तिच्यावर सुद्धा वार केले. त्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्यावर वार केले, यामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला.
जखमी युवतीला उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने युवतीचा अवघ्या तीन तासात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईच्या काळाचौकीसारख्या गर्दीच्या आणि दाटीवाटीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने थरारक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


COMMENTS