अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये बांगलादेशी बेकायदेशीर वास्तव्य करत आहेत. मानखुर्दमध्ये देखील अशा घटना घडत आहेत. आज पत्रकारांशी संवाद साधताना क...
अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये बांगलादेशी बेकायदेशीर वास्तव्य करत आहेत. मानखुर्दमध्ये देखील अशा घटना घडत आहेत. आज पत्रकारांशी संवाद साधताना किरीट सौमय्या यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
"हिंदू नाव ज्योती लावून बाबू खान स्वतःला किन्नर म्हणून घेत आहे. अशी मोठी टोळी आहे. या टोळीचा काल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आतापर्यंत त्या बाबू खान याने ३०० बांग्लादेशींना हिंदुस्थानात आणलं, अशी माहिती मिळत आहे. काल मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आज दुपारी गोवंडी मानखुर्द पोलिस स्टेशन मध्ये जाणार आहे. १००० हून अधिक बांग्लादेशींना खोटे जन्म प्रमाणपत्र हा जो ज्योती बाबू खान आहे त्याने सुद्धा खोट्या नावाने खोटे जन्मपत्र गोवंडी महापालिका कार्यालयातून काढलंय. गेल्या आठवड्यात १०० बोगस जन्मपत्रांच्या घोटाळ्यावर २ दिवसांत पोलीस FIR दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती केली आहे. या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करा. हजारो बांगलादेशी सापडतील."
पुढे ते म्हणाले,"२०२४ नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो, अमित शहा असो, देवेंद्र फडणवीस असो विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या समर्थनात मुस्लिम मौलवी नेते उतरले होते. १३४ कोटींचा व्होट जिहाद फंडिंग घोटाळा मी उघडकीस आणला होता. २ लाख २४ हजार लोकांनी बोगस जन्म प्रमाणपत्र मिळवलं होतं हा घोटाळा सुद्धा मी उघडकीस आणला होता. आणि आतासुद्धा ज्योतीचा नवीन घोटाळा. आधार कार्ड घोटाळा देखील उघडकीस आणला आहे. ४७ हजार आधार कार्ड बोगस निघाले."
यावर पत्रकारांनी या सर्व गोष्टी सरकारच्या हातात असतात, केंद्रात भाजपची सत्ता आहे असे विचारले असता किरीट सोमय्या यांनी पलटवार करत म्हटलं,"राज्याला आरोग्य आणि जन्म मृत्यू नोंद हे सगळे अधिकार राज्यांना आहेत. त्यामुळे केंद्र फारसं काही करू शकत नाही. पण हेदेखील खरं आहे की २०१४ पर्यंत भाजपचं मुलीधुली सरकार आलं होतं. २०१९ नंतर केंद्र सरकार सतर्क झालं. अनेक सुधारणा झाल्या आणि अनेक जणांना यानंतर अटक झाली आहे." त्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बोलताना म्हणाले," एकाचं डिपॉझिट गेल आणि एकाची इज्जत निवडणुकीत गेली. लोकसभा २०२४ मध्ये उद्धव ठाकरेंनी लोकांची फसवणूक केली. म्हणून बाळासाहेब ठाकरेंचे जे मराठी मतदार आहेत त्यांनी यांना मतदान केलं नाही, हे सगळे हिरवे वस्त्रधारी आहेत."अशा परखड शब्दांत त्यांनी टीका केली.


COMMENTS