ही तर विरोधकांची महा कन्फ्यूजन आघाडी." एकनाथ शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल. | CrimeNama
Loading ...

ही तर विरोधकांची महा कन्फ्यूजन आघाडी." एकनाथ शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल.

राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं नवं सत्र सुरू झालं आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्या...



राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं नवं सत्र सुरू झालं आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयोगात जाऊन निवडणूक आयुक्तांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं आणि मतदार याद्यांमधील घोळ संपुष्टात येईपर्यंत निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी केली.

मात्र, या मागणीवर सत्ताधारी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.


राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं नवं सत्र सुरू झालं आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयोगात जाऊन निवडणूक आयुक्तांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं आणि मतदार याद्यांमधील घोळ संपुष्टात येईपर्यंत निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी केली. मात्र, या मागणीवर सत्ताधारी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत म्हटलं आहे की, "ही विरोधकांची महा कन्फ्यूजन आघाडी आहे. पराभव समोर दिसू लागल्यामुळेच त्यांच्यापायाखालची वाळू सरकली आहे, आणि त्यामुळेच आता ते निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत." शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलं की, "महायुती जिंकणार याची खात्री विरोधकांना झाली आहे. विधानसभेत झालेल्या पराभवामुळे विरोधकांची मानसिकता खचली असून, आता निवडणुकांना सामोरे जाण्याची त्यांच्यात हिम्मत उरलेली नाही."


त्यांनी पुढे टोला लगावत म्हटलं की, "जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या, तेव्हा निवडणूक आयोग चांगला होता, ईव्हीएम चांगली होती. पण आता पराभव झाल्यावर तेच आयोग आणि मशीन खराब वाटू लागलं आहे. ही ईव्हीएम प्रणाली काँग्रेसच्या काळात सुरू झाली, आमच्या महायुतीच्या नाही, हे लोक विसरले आहेत."


याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही उपरोधिक टोला लगावला. राज ठाकरे यांनी नुकतेच विधानसभेच्या निकालानंतर "सर्वत्र सन्नाटा" असं वक्तव्य केलं होतं. त्यावर शिंदे म्हणाले, "सन्नाटा आमच्याकडे आहे की त्यांच्याकडे, हे लोकच गोंधळले आहेत. सगळे एकत्र येतात तेव्हा जिंकण्याची खात्री पटली पाहिजे, पण ते निवडणूक पुढे ढकला म्हणत आहेत म्हणजे त्यांनाच आपल्या पराभवाची खात्री आहे."


त्यांनी पुढे सांगितलं की, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती पूर्ण ताकदीने उतरणार आहे. गेल्या २.५ ते ३ वर्षांत आम्ही जनतेसाठी विकासाची लोकाभिमुख कामं केली आहेत. या कामांच्या बळावर आम्ही निवडणुकीत उतरू, आणि आमच्या लाडक्या बहिणी विरोधकांना चारीमुंड्या चित करतील."


पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या किटवरूनही राजकीय वाद पेटला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून वितरित करण्यात येणाऱ्या या किटवर उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं "उद्धव ठाकरे यांचा फोटो लावलाय ना, चांगलं आहे. मला त्याबद्दल काही आक्षेप नाही." मात्र काही दिवसांपूर्वी, अशाच प्रकारच्या मदत किटवर शिंदेंचा फोटो असल्याने उद्धव ठाकरे यांनी उपरोधिक टीका केली होती.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,78,Amaravati,14,Aurangabad,30,Breakin,1,Breaking,3478,Buldhana,15,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1006,Dhule,12,Entertainment,54,Gadchiroli,5,Health,449,India,427,Jalgaon,29,Jalna,13,Kolhapur,21,Lifestyle,286,Maharashtra,1613,Mumbai,388,Nagpur,39,Nashik,53,Politics,587,Pune,1816,Raigad,23,Ratnagiri,19,Sangali,27,Satara,45,Sindhudurg,5,Solapur,35,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: ही तर विरोधकांची महा कन्फ्यूजन आघाडी." एकनाथ शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल.
ही तर विरोधकांची महा कन्फ्यूजन आघाडी." एकनाथ शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhSN3wdAnGOUyDaxXYp00ploZjlcYENOhMV2qPrYWE4g51p6SryCDI-feYwHtWd30nwPXEAh9pktuqjvNwKbEmJiGPYFQwZ2-2u6eXJrhFjfaoaK8GbDwrPZzqWq1a0cw7uMbQs2NuI_RvzYrJWgb69EmTImP8ZLbyPhB5mmwpbipLqIFnuQUepM21ty7M/s320/1001391579.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhSN3wdAnGOUyDaxXYp00ploZjlcYENOhMV2qPrYWE4g51p6SryCDI-feYwHtWd30nwPXEAh9pktuqjvNwKbEmJiGPYFQwZ2-2u6eXJrhFjfaoaK8GbDwrPZzqWq1a0cw7uMbQs2NuI_RvzYrJWgb69EmTImP8ZLbyPhB5mmwpbipLqIFnuQUepM21ty7M/s72-c/1001391579.png
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_56.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_56.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content