राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई चर्चगेट येथे भाजपच्या नवीन प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन (BJP Maharashtra State...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई चर्चगेट येथे भाजपच्या नवीन प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन (BJP Maharashtra State Headquarter) पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
यावर रोहित पवार यांनी कार्यालयाच्या जमिनीवर आक्षेप घेतला आहे. सदरील जागा महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची ९९ वर्ष लीजवर घेतलेली जागा असून इमारत धोकादायक आहे असे दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली, असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई चर्चगेट येथे भाजपच्या नवीन प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन (BJP Maharashtra State Headquarter) पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यावर रोहित पवार यांनी कार्यालयाच्या जमिनीवर आक्षेप घेतला आहे. सदरील जागा महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची ९९ वर्ष लीजवर घेतलेली जागा असून इमारत धोकादायक आहे असे दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली, असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत, राज्यात जमीन घोटाळे जोमात असताना आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाच्या जागेबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. सदरील जागा महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन ची ९९ वर्ष लीजवर घेतलेली जागा असून इमारत धोकादायक आहे असे दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन होत असल्याची चर्चा आहे.
एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोष असताना भाजपा कार्यालयाच्या जागेबाबतच चर्चा सुरु असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, त्यामुळे भाजपा नेत्यांनी यावर खुलासा करणे योग्य राहील.
दरम्यान, त्यांनी आणखी एक पोस्ट करत, राज्यात सध्या सुरु गुन्हेगारीवर अंकुश ठेवत सरकारवर निशाणा साधला आहे. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, वैष्णवी हगवणे आणि आता डॉ. संपदा मुंडे हे किडलेल्या आणि भ्रष्ट व्यवस्थेने केलेले खून आहेत. सत्ता संवेदनशील आणि खमक्या हातात असेल तर हे रोखणं कठीण नाही, पण आज सत्तेचा वापर केवळ विरोधकाला संपवण्यासाठी आणि आपली दुकाने राखण्यासाठीच केला जातो. अशा वेळी सरकार जर आपली भूमिका योग्य पद्धतीने वठवत नसेल तर मग जनतेनेच सामूहिकपणे सरकारची वेसण ओढून वठणीवर आणण्याची गरज आहे. अन्यथा राज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे बळी यापुढंही जात राहतील आणि आपल्याला केवळ मूकपणे बघत बसावं लागेल, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.


COMMENTS