आत्महत्येपूर्वी शेवटचा फोन कोणाला केला? काय झालं संभाषण? | CrimeNama
Loading ...

आत्महत्येपूर्वी शेवटचा फोन कोणाला केला? काय झालं संभाषण?

सातारा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाती महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हाताव...



सातारा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाती महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली होती.

या सुसाईड नोटमध्ये तिने पोलीस अधिकाऱ्यावर अत्यंत गंभीर आरोप केला होता. पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. याच प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे.


फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. गुरुवारी रात्री उशिरा तिने आयुष्याचा शेवट केला. शुक्रवारी सकाळी तिने बराच वेळ दरवाजा उघडला नाही आणि कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी हॉटेल रूमचा दरवाजा उघडला असता डॉक्टर तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पण या मृतक तरुणीच्या हातावर पेनाने लिहिलेली सुसाईड नोट आढळली आणि एकच खळबळ उडाली. कारण, आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या तरुणीने पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. गोपाळ बदने याने 4 वेळा बलात्कार केल्याचंही तिने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. तर व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर यांनी तिचा मानसिक छळ केल्याचं म्हटलं.



तरुणीचा शेवटचा फोन कोणाला?


एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, महिला डॉक्टर ही आरोपी प्रशांत बनकर याच्या वडिलांच्या फलटण येथील फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून राहत होती. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आत्महत्येपूर्वी तिने पुण्यात राहणाऱ्या प्रशांतला फोन केला होता आणि दोघांनी चॅट अॅपवर मेसेजची देवाणघेवाण देखील झाली होती.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,77,Amaravati,14,Aurangabad,30,Breakin,1,Breaking,3474,Buldhana,15,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1003,Dhule,12,Entertainment,54,Gadchiroli,5,Health,449,India,425,Jalgaon,29,Jalna,13,Kolhapur,21,Lifestyle,286,Maharashtra,1613,Mumbai,388,Nagpur,39,Nashik,53,Politics,587,Pune,1815,Raigad,23,Ratnagiri,19,Sangali,27,Satara,45,Sindhudurg,5,Solapur,35,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: आत्महत्येपूर्वी शेवटचा फोन कोणाला केला? काय झालं संभाषण?
आत्महत्येपूर्वी शेवटचा फोन कोणाला केला? काय झालं संभाषण?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEijJevR3eo-ObwLEdeRLHwy6saFDh8IaY7cnBoH5UBq4OhNLpW5eiZfOOUQPOSE6J905zjgUZHU9h_StQqKSrvifUPVfcJAJYJJnbSrz-n5x-DBKqVu0ht8P917-TnV4Hx14gU0NulNVresaIOYbFGHUWOrXp1IKlB4WDaxIPnWUG1-tcD7ifxsIbg_kZo/s320/1001434221.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEijJevR3eo-ObwLEdeRLHwy6saFDh8IaY7cnBoH5UBq4OhNLpW5eiZfOOUQPOSE6J905zjgUZHU9h_StQqKSrvifUPVfcJAJYJJnbSrz-n5x-DBKqVu0ht8P917-TnV4Hx14gU0NulNVresaIOYbFGHUWOrXp1IKlB4WDaxIPnWUG1-tcD7ifxsIbg_kZo/s72-c/1001434221.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_44.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_44.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content