आज म्हणजे १४ ऑक्टोबर रोजी राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वा...
आज म्हणजे १४ ऑक्टोबर रोजी राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे याच बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर. धोरण कालावधीत ₹५०,००० कोटींची गुंतवणूक, ५ लाखांवर रोजगार निर्मिती. राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करणार. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार.
राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय. (उद्योग विभाग)
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते गट ड संवर्गात २२२८ पदांची निर्मिती. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (विधि व न्याय विभाग)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या 'द पीपल्स एज्युकेशन सोसायटी'च्या विकासासाठी योजना. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतीगृहांच्या इमारतींचा जीर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरीता नियोजन केले जाणार. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील ९ शिक्षण संस्था, २ वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. ५ वर्षासाठी ₹५०० कोटीच्या निधीची तरतूद. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)


COMMENTS