आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक. | CrimeNama
Loading ...

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक.

  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीआधीच मनसे आणि शिवसेना यांचा एकत्र मोर्चा चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणू...

 


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीआधीच मनसे आणि शिवसेना यांचा एकत्र मोर्चा चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवालयावर दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार देखील शिवालयावर दाखल झाले आहेत. आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची हालचाल झाली आहे. कारण, राज्यातील महत्वाच्या निवडणुका जवळ येत असतानाच सर्वपक्षीय नेत्यांचं एक प्रतिनिधी मंडळ आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिघेही एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळे या भेटीला राजकीय दृष्ट्या मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.

सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात हे सर्व नेते शिवालयावरून निघाले आहेत. या भेटीचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील आगामी निवडणुकांबाबत निर्माण झालेल्या शंका दूर करणे आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दृढ करणे. लोकशाही अधिक बळकट व्हावी आणि निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, हीच या भेटीची भावना आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पडाव्यात आणि मतदार याद्यांमधील घोळाचा जाब विचारावा, या मागणीसाठी हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. 'निवडणूक म्हणजे मोठा फ्रॉड झाला आहे,' असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला असून, याचे पुरावे आयोगाला देणार असल्याचे म्हटले आहे. या भेटीमुळे शिवसेना आणि मनसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही या शिष्टमंडळात सामील होणार आहेत, ज्यामुळे या भेटीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


दरम्यान, या भेटीसाठी पत्रक जारी करूनही सत्ताधारी पक्षातील कोणताही नेता उपस्थित राहणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले "निवडणुका पारदर्शक होणं ही जबाबदारी निवडणूक आयोगाबरोबर सत्ताधारी पक्षांचीही आहे. जर तेच सहभागी होत नसतील, तर त्यांना निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात असं वाटत नाही का?" देशपांडे पुढे म्हणाले की, "मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ आहेत, काही ठिकाणी तर नावं परदेशी भाषेत आहेत. मग हे सगळं सुधारायचं काम कोणाचं?" हे पाहून महत्वाचं ठरेल.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,78,Amaravati,14,Aurangabad,30,Breakin,1,Breaking,3479,Buldhana,15,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1006,Dhule,12,Entertainment,54,Gadchiroli,5,Health,449,India,427,Jalgaon,29,Jalna,13,Kolhapur,21,Lifestyle,286,Maharashtra,1613,Mumbai,388,Nagpur,39,Nashik,53,Politics,587,Pune,1817,Raigad,23,Ratnagiri,19,Sangali,27,Satara,45,Sindhudurg,5,Solapur,35,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqdRhKou1kXq8hyphenhyphenOo_MX5Zxm7UV8aRYUbPZC7VgNARCx1SZayTBLihoyv9T2bURC2cnHi9wTtCLoCCd3sFzTbLkaGzdcuq46EJo4RXFIcsEKD78ONF2jP4J7m-1ZJiWz-kMJ40knni5EKX1d189-a4bfdBcWxf-7ebuCM1mHwwd1Rl2DUZPDtx44iWyoU/s320/1001385085.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqdRhKou1kXq8hyphenhyphenOo_MX5Zxm7UV8aRYUbPZC7VgNARCx1SZayTBLihoyv9T2bURC2cnHi9wTtCLoCCd3sFzTbLkaGzdcuq46EJo4RXFIcsEKD78ONF2jP4J7m-1ZJiWz-kMJ40knni5EKX1d189-a4bfdBcWxf-7ebuCM1mHwwd1Rl2DUZPDtx44iWyoU/s72-c/1001385085.png
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_30.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_30.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content