महाराष्ट्रात येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पारदर्शक आणि निष्पक्ष होण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्ष...
महाराष्ट्रात येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पारदर्शक आणि निष्पक्ष होण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयोगाला २ वेळा भेट दिली.
तसेच निवेदन सादर केले. तसेच प्रश्न देखील उपस्थित केले. यासंदर्भात आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मतदार यादीतील घोळ यावर भाष्य केले. तसेच जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊन दाखवा, असे खुले आव्हान देखील राज ठाकरे यांनी यावेळी निवडणूक आयोगाला केले आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता मतदार यादीतील घोळासंदर्भात सर्व पक्षीय पत्रकारप अरिषद पार पडली. यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी १ नोव्हेंबर रोजी सर्व पक्षीय मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.
Balasaheb Thorat: महाराष्ट्रात येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पारदर्शक आणि निष्पक्ष होण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयोगाला २ वेळा भेट दिली. तसेच निवेदन सादर केले. तसेच प्रश्न देखील उपस्थित केले. यासंदर्भात आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मतदार यादीतील घोळ यावर भाष्य केले. तसेच जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊन दाखवा, असे खुले आव्हान देखील राज ठाकरे यांनी यावेळी निवडणूक आयोगाला केले आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता मतदार यादीतील घोळासंदर्भात सर्व पक्षीय पत्रकारप अरिषद पार पडली. यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी १ नोव्हेंबर रोजी सर्व पक्षीय मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.
तर मतदार यादीतील घोळ हा सर्वप्रथम काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जनतेसमोर मांडला होता. यावर आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांच्या याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे, ही वस्तुस्थिती आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
काही ठिकाणी नावं घुसवलेली आहेत, ही दुरुस्ती झालीच पाहिजे. मतदारांच्या याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे, ही वस्तुस्थिती आहे. मतदार यादींची दुरुस्ती व्हावी, या मताचे आम्ही देखील आहोत. निवडणुकीसाठी अनेक फंडे वापरले जात आहे. त्यातच मतदार यादीचा घोळ हा मोठा फंडा आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर केला आहे. बाहेरचे लोक आणून मतदार यादीत घालायचे. वेगवेगळे मतदान घडवून आणायचे, हे दुर्दैव आहे. डिजिटल काळात हे घडवून आणत आहेत. मतदान हे लोकशाहीचे सूत्र आहे. लोकशाहीसाठी देखील हे दुर्दैवाचं आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मंत्र तंत्रचे धडे देण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना कुठे मदत मिळाली? मराठवाड्यात कुठे किती मदत दिली? शेतकऱ्यांच्या मदती ऐवजी इतर विषय काढायचे आणि लोकांना धर्मात जातीत घेऊन जायचे आणि वेगवेगळे लक्ष विचलित करायचे. तसेच मंत्रातंत्र्याचे अभ्यासक्रम सुरू करत असाल, तर यापेक्षा वाईट काही नाही, असे देखील बाळासाहेब थोरात म्हणाले.


COMMENTS