फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राजकरण चांगलेच तापले आहे. यावरून अनेक राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. यामुळे वैद्यकीय सेवेवरच नव्हे तर प...
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राजकरण चांगलेच तापले आहे. यावरून अनेक राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. यामुळे वैद्यकीय सेवेवरच नव्हे तर प्रशासकीय सेवेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, गृहखाते आजगरासारखं निपचित.आता भाजपमधील महिला नेत्या कुठे गेल्या? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Sanjay Raut: फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राजकरण चांगलेच तापले आहे. यावरून अनेक राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. यामुळे वैद्यकीय सेवेवरच नव्हे तर प्रशासकीय सेवेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, गृहखाते आजगरासारखं निपचित.आता भाजपमधील महिला नेत्या कुठे गेल्या? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
काल महाराष्ट्रात दोन गंभीर गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या. पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा बोजवारा हे स्पष्ट झालं. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आल्यापासून त्यांचं लक्ष कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याच्याकडे नसून विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात काय कारस्थान करता येईल यात आहे. डॉक्टर महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणारे पोलीस दलातील लोक आहेत. तर दुसरी घटना ही मुंबईतील रस्त्यावर घडली. एका युवतीवर सपासप वार करून हत्या करण्यात आली. अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सातत्याने वाढताना दिसत आहेत. या आधीच्या घटनांच्या तपासाचे काय झाले? या राज्याच्या पोलिस महासंचालक पदी एक महिला अधिकारी आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या महान महिला नेत्या कुठे गेल्या? सरकारची प्रशासनावर पकड नाही, असा थेट आरोपच संजय राऊत यांनी विचारला आहे.
नितीन गडकरी कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात. त्यांच्या कान टोचण्याचा उपयोग होतो का? हे पाहायला पाहिजे. महाराष्ट्र व देशामध्ये जो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे तो मूळ पक्ष नाही. भारतीय जनता पार्टीतील ६० ते ६५ टक्के आमदार बाहेरून आलेले आहेत. काल संघावर टीका करणारे लोकं आज संघाच्या चड्ड्या घालून फिरतात. भाजप १५० + चा नारा देईल, शिंदे गट १२० आणि अजित पवार गट १०० जागा जिंकतील, असा त्यांचा आत्मविश्वास दिसतोय, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, हे लक्षात घ्या. मुंबईमध्ये आणि ठाण्यात भाजप मिंदे गटाला पराभव स्पष्ट दिसत आहे. आमचा महापौर आमचं टार्गेट पूर्ण आहे. आम्ही सर्व सहकारी पक्ष मिळून ५५ ते ६० टक्के मतं घेतोय. आमचा महापौर कोणाच्याही टेकूशिवाय बसणार. परिस्थिती दररोज बदलत आहे, आम्हाला मिळून उत्तम आकडा भेटत आहे. असे संजय राऊत महापालिका निवडणुकांबद्दल म्हणाले.


COMMENTS