सोलापूर: जुन्या (Crime News) शहरातील मारोतीनगर परिसरात घडलेल्या एका भयानक हत्येने संपूर्ण सोलापूर हादरले आहे. अक्षय नागलकर (वय 26) या तरुणाच...
सोलापूर: जुन्या (Crime News) शहरातील मारोतीनगर परिसरात घडलेल्या एका भयानक हत्येने संपूर्ण सोलापूर हादरले आहे. अक्षय नागलकर (वय 26) या तरुणाचा खून जुना वाद मिटवण्यासाठी नियोजनबद्ध रित्या करण्यात आला असल्याचे तपासातून उघड झाले आहे.
या भीषण प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विशेष पथकांनी केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. अखेर, मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर याच्यासह चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
अक्षयची हत्या करण्यासाठी आरोपींनी अत्यंत चलाखपणे सापळा रचला होता. त्यांनी अक्षयचा विश्वास संपादन करून त्याला हॉटेलवर जेवणासाठी बोलावले. अक्षयवर अचानक हल्ला करण्यात आला. डोळ्यांत मिरची पूड टाकून धारदार शस्त्रांनी त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. २३ ऑक्टोबर रोजी अक्षयच्या आईने पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता.
हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मोठी योजना आखली. त्यांनी मृतदेह मोरगाव भाकरे शिवारातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथली राख स्वच्छ करून शेडला रंग दिला, जेणेकरून कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही.
तपासादरम्यान उघड झाले की, चंद्रकांत बोरकर हा पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून, सुमारे 20 वर्षांपूर्वीच्या एका चर्चित स्कॅन्डलमध्येही त्याचा सहभाग होता. अक्षयसोबतच्या वैमनस्यातून सूड उगवण्यासाठी त्याने हा थरारक खून केल्याचे समोर येत असून पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMENTS