जाणीवपूर्वक अचानक दुचाकी थांबविल्याने पाठीमागून आलेल्या कारचा धक्का दुचाकीला लागला. या कारणावरुन दुचाकीस्वाराने रस्त्यावरील दगड मारुन कारच...
जाणीवपूर्वक अचानक दुचाकी थांबविल्याने पाठीमागून आलेल्या कारचा धक्का दुचाकीला लागला. या कारणावरुन दुचाकीस्वाराने रस्त्यावरील दगड मारुन कारच्या काचा फोडल्या.
हा दगड व काचा डोक्याला लागून कारमधील २ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अभिषेकुमार रवींद्र सिंधु (वय ३४, रा. मॅजिस्टीक पार्क, वडाची वाडी) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी लुईस अन्थोनियो गोईस (वय ५४, रा. सिल्व्हर हिल्स सोसायटी, पुणेकर, वस्ती, उंड्री) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उंड्री येथील हिल्स अॅन्ड डेल्स सोसायटी येथील रोडवर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषकेकुमार सिंधु हे आपल्या अनाया (वय २) हिला घेऊन कारने जात होते. होले वस्ती चौक या ठिकाणी लुईस गोईस या दुचाकीस्वाराबरोबर त्यांचा वाद झाला. तेथून ते पुढे गेले. त्यावेळी मागाहून कार येत असल्याचे पाहून लुईस गोईस याने जाणीवपूर्वक अचानक ब्रेक दाबून दुचाकी थांबविली. त्यामुळे मागाहून येणार्या कारचा दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे दुचाकीवरील मागे बसलेली महिला खाली पडली. त्या रागातून लुईस याने अभिषेककुमार याच्याशी वाद घालून रस्त्याचे बाजुला पडलेला दगड उचलून त्यांच्या कारच्या पॅसेंजर सीटच्या पुढील बाजुच्या डाव्या काचेवर मारला. तो दगड पुढील सीटवर बसलेल्या २ वर्षांच्या अनाया हिच्या डोक्यात लागून गंभीर दुखापत झाली. त्याने पुढील काच फोडून कारचे नुकसान केले. जखमी झालेल्या अनाया हिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या डोक्याचे डावे बाजूस फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक हंचाटे तपास करीत आहेत.


COMMENTS