मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेला आहे. आझाद मैदानातील मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरका...
मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेला आहे. आझाद मैदानातील मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय हे त्यातील मोठं पाऊल ठरलं.
मात्र या निर्णयानंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आणि नाराजीचं वातावरण आहे. अशातच आता मराठा आरक्षणा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात केली याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी मराठा समाजाविरोधात मोठे पाउचलले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. धोंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शविल्यामुळे त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या टीसी काढण्यासाठी पालकांनी सामूहिक अर्ज केला आहे.याचे पडसाद आता नांदेड जिल्ह्यात उमटताना दिसत आहेत.नांदेडमध्ये आता मराठा-ओबीसी वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.दरम्यान, नांदेड जिल्ह्यातून मराठा आरक्षणविरोधात शिवा संघटनेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या संघटनेचे अध्यक्ष असलेल्या प्रा. मनोहर धोंडे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे त्यांच्या संस्थेतील शाळांमध्ये आमच्या पाल्यांना शिक्षण द्यायचे नाही, असा पवित्रा लोहा तालुक्यातील मराठा पालकांनी घेतला आहे. जवळपास २१ पालकांनी एकत्र येत मनोहर धोंडे हे सचिव असलेल्या रिसनगाव येथील माँ.मीनाताई ठाकरे आश्रम शाळेतून आपल्या पाल्यांची टीसी द्यावी, असा अर्ज केला आहे. दरम्यान, प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी घेतलेली भूमिका ही कायदेशीर आहे असं मत ओबीसी बांधवांनी व्यक्त केल आहे. आरक्षणाच्या लढाईमुळे गावगाड्यातील वातावरण चांगलं तापलं असून मराठा विरुद्ध ओबीसी असावा आता वाद पेटला आहे.


COMMENTS