पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये अव्वल आलेल्या अश्विनी केदारी या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे. २८ ऑगस्ट ...
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये अव्वल आलेल्या अश्विनी केदारी या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे. २८ ऑगस्ट रोजी तिच्यासोबत दु:खद प्रकार घडला होता. गेल्या अकरा दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती.
पण तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. ऐन गणेश विसर्जनाच्या काळात पीएसआय अश्विनी केदारीचा मृत्यू झाला आहे.
खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता. पाळू गावची कन्या अश्विनी केदारी ही 2023 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिली आली होती. तिच्या निधनाने संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


COMMENTS