लखनौ (उत्तर प्रदेश): एकाने आईची हत्या केली आणि तिच्या नावाने कंपनीकडून 22 लाख रुपयांचा विमा दावा केला. वडिलांची हत्या केली आणि विमा कंपन्यां...
लखनौ (उत्तर प्रदेश): एकाने आईची हत्या केली आणि तिच्या नावाने कंपनीकडून 22 लाख रुपयांचा विमा दावा केला. वडिलांची हत्या केली आणि विमा कंपन्यांकडून 39 कोटी रुपयांचा दावा केला. एका कंपनीने त्याला 1.5 कोटी रुपये तर दिले.
इन्शुरन्स कंपनीने पैसे देण्याआधी चौकशी सुरू केली. तपासात असे दिसून आले की आरोपीने वेगवेगळ्या स्त्रोतांकडून 50 हून अधिक विमा पॉलिसीन काढल्या होत्या. पुढील तपासात, कंपनीला असे आढळून आले की गेल्या आठ वर्षांत पत्नी आणि पालकांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.
कंपनीने वडिलांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि हॉस्पिटलच्या नोंदींची तुलना केली. दोन्ही अहवालांमधील जखमा देखील जुळत नव्हत्या. या संशयाच्या आधारे, कंपनीने हापूरमध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रविवारी आरोपी विशाल सिंघल (रा. मेरठ) आणि त्याच्या मित्राला अटक केली. विशाल याची कठोर चौकशी करण्यात आली आणि त्याने त्याच्या पालकांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिस आता पत्नीच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. पत्नीच्या मृत्यूनंतरही त्यांनी विमा कंपनीकडून 80 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
मेरठमधील गंगानगर येथील रहिवासी मुकेश सिंघल छायाचित्रकार होते. त्यांचा मेरठ बाजारात एक फोटो स्टुडिओ होता. पत्नी प्रभा देवी गृहिणी होती. एकुलता विशाल हा एक मुलगा आहे. पत्नी, आई आणि वडील आठ वर्षांच्या आत मरण पावले. 2016 मध्ये पत्नीचे आणि 2017 मध्ये आईचे निधन झाले. पत्नीच्या मृत्यूसाठी 80 लाख रुपये आणि आईच्या मृत्यूसाठी 22 लाख रुपये मिळाले. त्यानंतर, कंपनीने सखोल चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर तो दोन महिलांना घरी घेऊन आला, पण दोघीही निघून गेल्या. विशालबद्दल विचारले असता शेजाऱ्यांनी सांगितले की त्याची पहिली पत्नी मेरठमधील मवाना येथील होती. तिचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. विशालला या पत्नीपासून मुलगा आहे.


COMMENTS