पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठ भागात असेलल्या लालबत्ती भागात एक युवक वेश्यागमनासाठी गेला होता. वेश्यागमनानंतर तिथल्या महिलांकडून त्याला बेदम...
पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठ भागात असेलल्या लालबत्ती भागात एक युवक वेश्यागमनासाठी गेला होता. वेश्यागमनानंतर तिथल्या महिलांकडून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
फिर्यादी युवक (वय ३९) १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता एका इमारतीत गेला आणि तमन्ना शाहरुख मुलाना (वय ३२, रा. दत्तवाडी) हिच्याशी व्यवहार ठरला. ठरल्याप्रमाणे ऑनलाइन पेमेंट करायचे होते; मात्र पासवर्ड विसरल्याने रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून वाद झाला.
तमन्नाने सुरुवातीला संताप व्यक्त करून शिवीगाळ केली. त्यानंतर तिच्या मदतीला तनुजा हकीमअली मौल्ला (वय ३४) आणि सोनिया गुलाम शेख (वय ३२, रा. बुधवार पेठ) या दोघी आल्या. तिघींनी मिळून फिर्यादी युवकाला बेदम मारहाण केली. यानंतर जखमी युवकाने थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. या तिघींविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फिर्यादी युवक बुधवार पेठेतील एका इमारतीत गेला आणि तिथे तमन्नाशी बोलणी झाली. ठरल्याप्रमाणे पैशांचा व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करायचा होता. मात्र, पेमेंट ऍपचा पासवर्ड आठवत नसल्यामुळे तरुणाकडून रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून युवक आणि तमन्ना यांच्यात मोठा वाद सुरु झाला सुरुवातीला तमन्नाने शिवीगाळ केली. "पैसा नाही तर इकडे कशाला आलास?" असे म्हणत तिने संताप व्यक्त केला. नंतर तनुजा आणि सोनिया या दोघीही तिथे आल्या. तिघींनी मिळून फिर्यादीवर धक्काबुक्की केली आणि त्याला चोप दिला. या प्रकारानंतर जखमी युवकाने थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पुढील तपास फरासखाना पोलिसांकडून सुरू आहे.’


COMMENTS