मुंबई : मीरा रोडजवळील काशीमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे. अभिनेत्री अनुष्का मोनी ...
मुंबई : मीरा रोडजवळील काशीमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे. अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास (वय ४१) हिला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत दोन टेलिव्हिजन मालिकांमधील तसेच बंगाली चित्रपटातील महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेली अभिनेत्री ही बंद करण्यात आलेल्या उल्लू अॅपमधील कलाकार असल्याचीही माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच उल्लू, अल्ट बालाजीसह अश्लील कंटेट प्रसारित करणाऱ्या 10 अॅपवर कारवाई करत हे अॅप भारतात बंद केली आहेत.
काशीमीरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन बनावट ग्राहक तयार केले. आरोपींनी ग्राहकांना मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या काशीमिरा येथील एका मॉलमध्ये बोलावले होते. पोलिसांनी सापळा रचत आरोपींना पैसे स्वीकारताना पकडले आणि त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सुटका केलेल्या दोन महिला कलाकार, ज्यांनी टीव्ही मालिकांमध्ये तसेच बंगाली चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. त्यांना ताब्यात घेऊन आश्रयगृहात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 370(3) (मानव तस्करीसंबंधी) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ‘हे रॅकेट उच्चभ्रू समाजातील ग्राहकांसाठी चालवले जात होते. आरोपी अभिनेत्री मध्यस्थाची भूमिका बजावत होती. तिला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.’ दरम्यान, संबंधित अभिनेत्रीने यापूर्वी उल्लू अॅपमधील सिरीजमध्ये काम केल्याची माहिती असून सरकारने उल्लू अॅपवर भारतात बंदी घातली आहे. कदाचित, त्यामुळेच या अभिनेत्रीने वेश्याव्यवसायाकडे आपला कल वळवल्याचे दिसून येत असून याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS