कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं एक अत्यंत धक्कदायक आणि सर्वांच्याच काळजाला चटका लावणारी धक्कादायक घटना नुकतीच स...
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं एक अत्यंत धक्कदायक आणि सर्वांच्याच काळजाला चटका लावणारी धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. कोडोली येथील दहा वर्षाच्या श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गणपती मंडळामध्ये खेळत असताना अचानक त्रास जाणवू लागल्यानं, तो पळत घरी जाऊन आईच्या कुशीत विसावला आणि तिथेच त्यानं अखेरचा श्वास घेतला. अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा हृदयविकारानं बळी गेल्यानं, कोडोली आणि परिसरामध्ये सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
नेमक काय घडल
कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या वैभवनगरमध्ये अजित गावडे हे आपल्या कुटुंबासह राहत होते. गुरुवारी संध्याकाळी अजित गावडे यांचा दहा वर्षाचा मुलगा, श्रावण हा गणपती मंडळामध्ये इतर लहान मुलांबरोबर खेळत होता.
खेळता खेळता त्याला अचानक त्याला काही तरी त्रास होऊ लागला. त्यामुळे तो पळत-पळत घरी गेला. यावेळी त्याने आपल्या आईला सांगितलं की, त्याला काही तरी त्रास होतो आहे. पण असं सांगत असतानचा तो त्याच्या आईच्या कुशीत गेला. ज्यानंतर अवघ्या काही क्षणाच्या आत त्याने आईच्या कुशीमध्येच अखेरचा श्वास घेतला. तीव्र स्वरूपाच्या हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मनमिळाऊ आणि खेळकर स्वभावाच्या श्रावणचा अचानक मृत्यू झाल्यानं, गावडे कुटुंबीयावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. संपूर्ण कुटुंबाला या घटनेने प्रचंड धक्का बसला आहे. अजित गावडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्यं होती. त्यांच्या मुलीचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि आता एकुलता एक श्रावणचाही अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं गावडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
लहान मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण का वाढत आहे
लहान मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढण्याची अनेक कारणे आहेत, ज्यात जन्मजात हृदयविकार आणि जीवनशैलीशी संबंधित हृदयविकारांचा समावेश होतो. खालीलप्रमाणे कारणे आणि माहिती यांचा तपशील आहे.


COMMENTS