बोतार्डे | जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथे दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर वाढू लागला आहे, त्यामुळे शेतात जाणारे शेतकरी व रानात जाणारे गुराखी य...
बोतार्डे | जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथे दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर वाढू लागला आहे, त्यामुळे शेतात जाणारे शेतकरी व रानात जाणारे गुराखी यांना आता मोठी भिती लागून राहिली आहे. मागे देखील बोतार्डे येथील केशव गाडेकर यांच्या शेळ्या बिबट्याने ठार केल्या होत्या मात्र त्यांना किती मदत मिळाली हे त्यांनाच माहित मात्र वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी वन विभाग निर्णय का? घेत नाही हा मात्र प्रश्न प्रलंबित राहतो. असो
सध्या पाऊस देखील मोठया प्रमाणात पडत असून रानात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे, या भागातील गुराखी आपली जनावरे चारण्यासाठी रानात घेऊन जातं असतात मात्र त्यांना आता दिवसा बिबट्या दिसू लागले आहेत, वास्तविक बिबटे हे त्यांना भक्ष्य न भेटल्याने शेळ्या व जनावरावर हल्ले करत आहेत, त्यामुळे आता बिबट्या दिवसा पण कुठेही दर्शन देऊ लागले आहेत, मागील दोन दिवसापूर्वी कुमशेत येथे लहान मुलावर हल्ला केल्याने मुलगा मयत झाला ही ताजी घटना असताना आता मात्र सर्रास या बिबट्याचा वावर होताना दिसतं आहे मात्र वन विभाग आणि प्रशासन ठोस निर्णय काही घेताना दिसतं नाही आतापर्यंत किती घटना घडल्या मात्र पुन्हा "ये रे माझ्या मागल्या" असं झालंय या प्रशासनाच माझी देखील आपणास विनंती असेल की, दुसरीकडे अशी घटना घडू नये म्हणून आपण ठोस पावले लवकरच उचलावीत व बोतार्डे गावात एक पिंजरा लावावा अशी आपणास क्राईमनामा live च्या वतीने विनंती.


COMMENTS